Home आरोग्य अबब …डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढले ६३ चमचे

अबब …डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढले ६३ चमचे

0 second read
0
0
46

no images were found

अबब …डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढले ६३ चमचे

मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पोटातून तब्बल ६३ चमचे बाहेर काढले. रुग्णाची अवस्था गंभीर आहे. डॉक्टरांनी रुग्णाला देखरेखीखाली ठेवलं आहे. रुग्णाच्या पोटातून इतक्या मोठ्या प्रमाणात चमचे काढण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे.

बोपाडा गावातील विजयला दारूचं व्यसन आहे. त्यामुळे कुटुंबानं त्याला नशामुक्ती केंद्रात दाखल केलं. शामलीमध्ये असलेल्या नशामुक्ती केंद्रात विजयचा जवळपास पाच महिने मुक्काम होता. तिथे असताना त्याची तब्येत बिघडली. कुटुंबियांनी त्याला मुझफ्फरनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून स्टिलचे ६३ चमचे काढले. त्याच्या पोटातून निघालेले चमचे पाहून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. विजयच्या पोटातून निघालेले चमचे पाहून कुटुंबीय चकित झाले. सध्या विजयची प्रकृती गंभीर आहे.

विजयच्या पोटात इतके चमचे कसे गेले, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. विजयनं अद्याप तरी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…