no images were found
ऐन नवरात्रीची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट, महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली : सुमारे १ कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोदी सरकारने नवरात्रीकाळात मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुले हा भत्ता आता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ जुलै ते डिसेंबर 2022 पर्यंत वैध असेल. ही वाढ 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्वीकारलेल्या सूत्रावर आधारित आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सध्या 34 टक्क्याने महागाई भत्ता दिला जात आहे. परंतु, महागाईचा भडका लक्षात घेता सरकारने त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर गेला आहे. या नव्या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय ऑक्टोरबर महिन्यात मागील तीन महिन्यांची सर्व थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.