Home शासकीय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत नामिका सूचीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत नामिका सूचीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

33 second read
0
0
14

no images were found

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत नामिका सूचीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर : केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावाहाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिका सूची तयार करावयाची आहे. त्यासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुकांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे.

 संसाधन व्यक्तीसाठी पात्रता पुढीलप्रमाणे- शैक्षणिक अर्हता- नामांकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी मधील पद‌विका, पदवी अथवा ज्या व्यक्तींना अन्न प्रक्रिया उद्योग बँकिंग, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व प्रशिक्षणाचा अनुभव आहे अशा व्यक्ती, पात्र अनुभवी सल्लागार संस्था. अनुभव- अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन, वृद्धी नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील 3 ते 5 वर्षांचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती.

 योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात नोटीस बोर्डवर उपलब्ध आहेत. तसेच कृषि विभाग महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे, अशी माहितीही श्री. भिंगारदेवे यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …