Home शासकीय लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी ऑनलाईन माहिती भरा

लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी ऑनलाईन माहिती भरा

2 second read
0
0
17

no images were found

लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी ऑनलाईन माहिती भरा

 

कोल्हापूर : सहकार, पणन व वस्त्रोद्योग अधिनस्त विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयाकरीता सरकार आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या उमेदवारांची विभागनिहाय यादी 10 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी व्यावसायिक चाचणीसाठी आवश्यक माहिती दि. 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावी, असे आवाहन विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी केले आहे.

 यादीनुसार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरणा-या निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदासाठीच्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी परीक्षा उमेदवार कोणत्या माध्यमातून (मराठी, इंग्रजी) देणार याबाबतचा तपशिल उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे. यासाठी दि. 5 ते 11 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत अर्ज ऑनलाईन लाईव्ह करुन देण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांनी लॉग-इन होऊन टॅब्स ओपन करुन आपल्या व्यावसायिक परीक्षेची भाषा, माध्यम नोंदवावी. तसेच ज्या पात्र उमेदवारांनी आपली कागदपत्रे अपलोड केली नसतील, त्यांनी आपली कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत, असेही श्री. काकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…