Home शैक्षणिक शिक्षक पदभरती: उमेदवारांकडून पसंतीक्रम देण्यासाठी मुदतवाढ

शिक्षक पदभरती: उमेदवारांकडून पसंतीक्रम देण्यासाठी मुदतवाढ

9 second read
0
0
21

no images were found

शिक्षक पदभरती: उमेदवारांकडून पसंतीक्रम देण्यासाठी मुदतवाढ

 

कोल्हापूर : शिक्षक पदभरतीकरिता पवित्र पोर्टलवर दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झालेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 2 लाख 17 हजार अभियोग्यता धारकांपैकी जवळपास 1 लाख 18 हजार धारकांनी शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नमूद केले आहेत. पवित्र पोर्टलवर सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी पसंतीक्रम देणे व लॉक करण्यासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  उमेदवारांनी विहित मुदतीत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. पवित्र पोर्टलवर व प्राधान्यकम लॉक करण्यासाठी https://mahateacherrecruitment.org.in या पोर्टलव्दारे सुविधा देण्यात आलेली आहे. उमेदवारांना शिक्षक पदभरतीबाबत आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. पवित्र पोर्टलवर पदभरती संबंधित सर्व बाबीसाठी केवळ edupavitra2022@gmail.com या ईमेलवर पत्रव्यवहार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) मीना शेंडकर यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…