no images were found
शिवसेनेचा कोल्हापुरात आनंदोत्सव, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!
कोल्हापूर (प्रतिनिधी): हलगीचा कडकडाट, “जय भवानी – जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा”चा घोष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत साखर पेढे वाटप करत कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी चौक येथे शनिवारी अकरा वाजता सुमारास शिवसेनेने साखरपेढे वाटप केले.
राज्य सरकारने सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाच्या संबंधित सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक छत्रपती शिवाजी चौक येथे जमले होते.प्रारंभी फटाक्यांची आतिषबाजी झाली. साखर-पेढे वाटप करण्यात आले. कार्यकर्त्यांनी, मुख्यमंत्री शिंदे व सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. तसेच”जय भवानी -जय शिवाजी, एक मराठा -लाख मराठा”अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, किशोर घाटगे, शहरप्रमुख रणजीत जाधव, संजय पाटील, अंकुश निपाणीकर, उदय भोसलेे, सुनील जाधव, रियाज बागवान, राजू काझी, उदय भोसले, निलेश हंकारे, कुणाल शिंदे, महिला आघाडीच्या मंगल साळुंखे पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, पूजा कामते, मंगल कुलकर्णी, गौरी माळकर नम्रता भोसले, अमरजा पाटील शारदा भोपळे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, “राज्यातील महायुती सरकारने सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यासह आंदोलन काळातील गुन्हेही मागे घेण्याचे सरकारने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मराठा समाजाला न्याय दिला आहे. यामुळे मराठा समाजातर्फे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.”