Home शैक्षणिक डॉ. एस.एस. मोरे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार

डॉ. एस.एस. मोरे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार

2 second read
0
0
48

no images were found

डॉ. एस.एस. मोरे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार

 

कोल्हापूर: प्रशासकीय कारणास्तव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रकाश गुरव, प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्र यांच्याकडून डॉ. एस.एस. मोरे, प्राध्यापक, बालरोग चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आल्याचा शासन निर्णय सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी जारी केला आहे.

  यानुसार डॉ. एस.एस. मोरे, प्राध्यापक, बालरोग चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांनी स्वतःच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या संभाळून राजर्षी  छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा. डॉ. प्रकाश गुरव, प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील मुळ पदावर तात्काळ रुजू व्हावे, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Load More Related Articles

Check Also

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, 

  इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढा…