no images were found
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पुजाऱ्याने स्वतःच्या तोंडावर कापड का टाकलं?
नवी दिल्ली : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा दरम्यानचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. प्राणप्रतिष्ठापणाच्या वेळी प्रभू रामाच्या दर्शनानं देशभरातील सर्वच लोक प्रसन्न झाले. अशातच यावेळी एका पुजाऱ्याच्या कृतीनं मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. पूजाऱ्यानं राम प्रतिष्ठापणेवेळी नैवैद्य अर्पण करताना स्वतःचं तोंड झाकून घेतलं. यामागचं कारण नेमकं काय होतं जाणून घेऊया.
राम मंदिरामध्ये प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी अनेक नैवेद्यांचा आवज ठेवण्यात आला होता. यावेळी उडूपीपेजावरचे मठाधीश स्वामी विश्वप्रसन्नातीर्थ यांनी आपलं तोंड कापडानं झाकलं. त्यांनी तोंडावर कापड घेतानाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांनी असं का केलं? असा प्रश्न अनेकांनी पडला आहे.
प्रभू रामला नैवेद्य ठेवताना, भोग दाखवताना स्वामी विश्वप्रसन्नातीर्थ यांनी आपलं तोंड कापडानं झाकण्यामागचं कारण म्हणजे, स्वामीजीचं म्हणणं आहे की, देवाला भोग लावताना तो स्वच्छ असायला हवं. नैवेद्याला पाहून मनात लालसा यायला नको. नाहीतर ते अशुद्ध होतो, त्यामुळे प्रभू रामाला नैवेद्य दाखवताना त्यांनी आपलं तोंड कापडानं झाकून घेतलं. जेणेकरुन भोग अशुद्ध होणार नाही.