Home शासकीय राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महापालिकेत प्रतिज्ञा

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महापालिकेत प्रतिज्ञा

49 second read
0
0
89

no images were found

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महापालिकेत प्रतिज्ञा

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. हि प्रतिज्ञा महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हि प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी सर्वांनी आम्ही, भारताचे नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपती व शांततपूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु अशी प्रतिज्ञा घेतली.

यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर अभियंता नारायण भोसले, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, घरफाळा अधीक्षक अशोक यादव, विजय वणकुद्रे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जरांगेंच्या मुद्द्यावरून महायुतीत वितुष्ट आणण्याचा विरोधकांचा कट-हेमंत पाटील

जरांगेंच्या मुद्द्यावरून महायुतीत वितुष्ट आणण्याचा विरोधकांचा कट-हेमंत पाटील : पक्षीय…