no images were found
बीएलएस ई सर्व्हिसेस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री ३० जानेवारी २०२४ पासून सुरू
बीएलएस ई सर्व्हिसेस लिमिटेड (“BLSEL” किंवा “कंपनी”), मंगळवार ३० जानेवारी २०२४ रोजी इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री खुली करेल. प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या एकूण इश्यू साईज मध्ये 2,30,30,000 पर्यंतचे इक्विटी समभागांचे फ्रेश इश्यू (11,00,000 इक्विटी समभागांचे प्री-आयपीओ प्लेसमेंट वगळून) समाविष्ट आहेत. प्रमुख गुंतवणूकदार बोलीची तारीख सोमवार, सोमवार २९ जानेवारी २०२४ असेल. ऑफर मंगळवार ३० जानेवारी २०२४ रोजी सदस्यत्वासाठी खुली होईल आणि गुरूवार १ फेब्रुवारी २०२४ रोजी बंद होईल. प्रत्येक इक्विटी शेअरसाठी 129 रुपये ते 135 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 108 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 108 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
बीएलएस आंतरराष्ट्रीय समभागधारकांकडून सबस्क्रीप्शनसाठी [●] लाख रु. पर्यंत 23,03,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या रिझरव्हेशनचा समावेश आहे (“बीएलएस इंटरनॅशनल शेअरहोल्डर्स रिझरव्हेशन पोर्शन”). बीआरएलएम बरोबर चर्चा करून आमच्या कंपनीने बीएलएस इंटरनॅशनल शेअरहोल्डर्स रिझरव्हेशन पोर्शनच्या (“शेअरहोल्डर डिसकाऊंट”) प्रत्येक इक्विटी शेअरसाठी 7 रु.ची सवलत सादर केली आहे.इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यू मधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर नवीन क्षमता विकसित करण्यासाठी आणि सध्याचे प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासाठी तांत्रिक पायाभूत सुविधा बळकट करण्याकरिता; बीएलएस स्टोअर्स उभारून ऑर्गनिक विकासाच्या उपक्रमांना निधीसाठी; संपादनाच्या माध्यमातून इन ऑर्गनिक विकास साधून आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टे यासाठी (“ऑब्जेक्टस ऑफ इश्यू”) वापरण्याचा प्रस्ताव आहे.इक्विटी शेअर्स २३ जानेवारी २०२४ रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, नॅशनल कॅपिटल ऑफ दिल्ली अँड हरयाणा सह सादर केले जात आहेत (“ROC”). या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर केले जात असलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. इश्यू साठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड हे नियोजित स्टॉक एक्स्चेंज असेल.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स 1957 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(2) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 75 % पेक्षा कमी नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल.