no images were found
डॉ. संतोष सुबराव घोडके आयुष ग्लोबल अवॉर्ड ने सन्मानीत
कोल्हापूर(प्रतिनिधी ): आयुष चिकित्सा (अॅक्युपंक्चर) क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.संतोष सुबराव घोडके यांना नुकताच आयुष ग्लोबल अवॉर्ड 2023 या भुषणास्पद पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. शिर्डी याठिकाणी आयुष इंटरनेशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) & आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. आयुष चिकित्सा (अॅक्युपंक्चर) या क्षेत्रात डॉ.संतोष घोडके हे जेम्स (गणेश) हॉस्पिटलमध्ये काम पाहतात. याविषयात त्यांना ३५ वर्षाचा अनुभव आहे. रुग्णसेवेबद्दल मिळाणारा हा पुरस्कार प्रेरणादायी असल्याचे मत याप्रसंगी त्यांनी केले.
याप्रसंगी एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषयावर कार्यक्रमाचे मुख्य अतिथि डॉ प्रवीण जोशी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून फिल्म स्टार देवदत्त नागे जी, डॉ प्रवीण जोशी सर उप संचालक तथा विशेष अतिथी श्री प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी एमएसएमई, टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार तथा फिल्म स्टार एवं टीवी एक्टर मिस ऋतुजा बागवे, फिल्म स्टार सुयोग गोऱ्हे आणि कलर टीवी मराठी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर, डॉ सतीश कराळे चेअरमन एआय एम ए. डॉ नितीनराजे पाटील, व्हाईस चेअरमन एआयएमए आणि समस्त टीम ए.आय.एम. ए, मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये हा अवॉर्ड देण्यात आला.
हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल डॉ.संतोष सुबराव घोडके यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे.