Home मनोरंजन “हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

8 second read
0
0
14

no images were found

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

 

सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ मालिका हनुमानाच्या प्रारंभिक जीवनातील काहीशा अज्ञात गोष्टी सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत देवी–देवतांकडून विविध वरदाने मिळाल्यानंतर बालमारुतीचे दिव्य आणि शक्तिशाली हनुमानात रूपांतर होण्याची कथा सुरस पद्धतीने विशद केली आहे. आन मारुती हा बाल कलाकार छोट्या मारुतीची भूमिका करत आहे. त्याने मारुतीच्या मनातील भावनिक खळबळ आणि आध्यात्मिक लढा उत्तमरित्या पडद्यावर साकारला आहे. या मालिकेत मारुती पिता केसरीची भूमिका आरव चौधरीने माता अंजनीची भूमिका सायली साळुंखेने आणि वाली व सुग्रीवाची दुहेरी भूमिका माहिर पांधीने साकारली आहे.

 

अलीकडेच हनुमान जयंतीच्या निमित्ताने आन तिवारीशी केलेल्या गप्पा-गोष्टींमध्ये त्याने या मालिकेचे शूटिंग, सहकलाकारांशी असलेले नाते आणि हनुमान जयंती तो कशा प्रकारे साजरी करणार आहे याविषयी सांगितले.

 

1. बाल हनुमानाची भूमिका करणे फारच रोमांचक असेल, नाही? तुला ही भूमिका मिळाल्याचे समजल्यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?

हनुमानाच्या बालपणाची कथा इतकी रोमांचक आहे प्रत्येकालाच ती निरागसता स्वतः अनुभवाविशी वाटत असेल. एक लहान मुलगा, ज्याला आपल्यातील शक्तींची जाणीव नाही, तो अशी काही चमत्कारिक कृत्ये करतो की सर्व जण अवाक होऊन जातात. त्यामुळे, जेव्हा मला माझ्या आईने सांगितले की मला हनुमानजीची भूमिका करायची आहे, तेव्हा मला फारच आनंद झाला. मला हे जाणवले की या भूमिकेच्या माध्यमातून मी एक चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगला माणूस होऊ शकतो.

 

2. हनुमानजीची भूमिका साकारण्यासाठी तू काय तयारी केलीस?

या भूमिकेच्या तयारीसाठी मी जिम्नॅस्टिक्स शिकण्यास सुरुवात केली. हनुमानाशी संबंधित अनेक व्हिडिओ मी पाहिले आणि त्यातून हे जाणून घेतले की ते कसे उभे राहतात, पायांची स्थिती कशी असली पाहिजे, ते नेहमी चेहऱ्यावर सौम्य हसू कसे ठेवतात, वगैरे. एक प्रसंग मला स्पष्ट आठवतो- माझे वडील मला बॅट देऊन ती गदेसारखी वापरण्याचा सराव देत असत. सकाळ-संध्याकाळ ते मला ती गदेसारखी उचलण्याचा आणि खाली आणण्याचा सराव करायला सांगत. त्याचा मला फायदा झाला.

 

3. हनुमानजी त्यांची शक्ती, भक्ती आणि युक्ती यांसाठी प्रसिद्ध आहेत. हनुमानजींचा असा कोणता गुण आहे, जो तुला सर्वात जास्त आवडतो आणि तू त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो?

हनुमानजींच्या मनात आपल्या प्रियजनांविषयी जो भक्तीभाव आहे, तो मला फारच आवडतो. ते नेहमीच निरपेक्ष भावनेने आपल्या प्रियजनांची मदत करण्यास तत्पर असतात. मी देखील जेव्हा गरज असेल तेव्हा माझ्या घरच्यांना आणि मित्रांना मदत करून हनुमानजींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो.

 

4. या मलिकेत काम करत असताना हनुमानजींविषयी तू काही नवीन किंवा रोचक जाणलेस का, जे तुला आधी माहीत नव्हते?

मला वाटते की, थोड्याच कालावधीत मी बरेच काही जाणले आहे आणि अजूनही दररोज मी काहीतरी नवीन शिकत आहे, जाणत आहे. अलीकडेच मला हे नव्याने समजले की हनुमानजींना कोणी आणि का वेगवेगळी वरदाने दिली. आधी तर मला फक्त मोठ्या, बलशाली हनुमानजींबद्दलच माहीत होते. पण आता, या मालिकेत काम करताना, मला हे समजते आहे की लहानपणी हनुमानजी किती खेळकर आणि खोडकर होते.

 

5. सेटवरचा तुझा अनुभव कसा आहे? आपल्या सहकलाकारांशी आणि टीमशी तुझे संबंध कसे आहेत?

सेटवरचा माझा आत्तापर्यंतचा अनुभव खूपच मस्त आहे. प्रत्येकजण मला समजून आणि सांभाळून घेतो. मला एखादा संवाद समजला नाही, तर आमचे दिग्दर्शक अत्यंत शांतपणे मला संवाद कसा बोलायचा ते शिकवतात. माहिर भैया आणि मी सेटवर खूप धमाल करतो. आमचे शूटिंग सामान्यतः एकाच वेळी नसते, पण जेव्हा जेव्हा आम्ही सेटवर एकत्र असतो, तेव्हा आम्ही खूप मस्ती करतो!

 

6. हनुमान जयंती हा अनेक लोकांसाठी खूप मोठा आणि मंगल दिवस असतो. तू हा सण काही वेगळ्या प्रकारे साजरा करतोस का? या सणाविषयीची कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त आवडते?

हनुमान जयंतीला आम्ही आवर्जून मंदिरात जातो. आम्ही मंदिरात जातो, प्रसाद वाटतो आणि संध्याकाळी मी आणि माझे वडील मिळून हनुमान चालीसा म्हणतो. गेल्या वेळेस, मंदिरात एक कार्यक्रम होता, ज्यात मी मंचावर उभे राहून हनुमान चालीसा म्हटला होता आणि सगळ्यांनी माझे खूप कौतुक केले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …