Home शासकीय राधानगरी ते दाजीपुर रस्त्यावरुन 30 एप्रिल पर्यंत दिवसा वाहतूक करण्यास परवानगी

राधानगरी ते दाजीपुर रस्त्यावरुन 30 एप्रिल पर्यंत दिवसा वाहतूक करण्यास परवानगी

19 second read
0
0
24

no images were found

राधानगरी ते दाजीपुर रस्त्यावरुन 30 एप्रिल पर्यंत

दिवसा वाहतूक करण्यास परवानगी

 

कोल्हापूर, : राधानगरी- दाजीपुर रस्त्याच्या बाजूला न्यू करंजे, राऊतवाडी, मांडरेवाडी, शेळप, बांबर, सतिचामाळ व हसणे अंतर्गत गावे असल्याने या गावातील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी राधानगरी- दाजीपुर हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरुन गावातील सर्व मुले शिक्षणासाठी व नोकरदार फोंडा व राधानगरी येथे ये-जा करत असतात. विद्यार्थी, नोकरदार व स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी शाळेच्या वेळेमध्ये नियमित एस. टी. बस सेवा सुरु ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी मोटार वाहन कायदा 115 व 116 अन्वये प्राप्त अधिकारान्वये दिनांक 5 मार्च 2025 च्या अधिसूचनामध्ये दुरुस्ती करुन दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस व अत्यावश्यक सेवेसाठी ॲम्ब्युलन्सला वाहतुकीच्या नियमांच्या अधीन राहून फक्त दिवसा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार वाहतुक सुरक्षा उपाययोजनाव्दारे वाहतूक नियंत्रीत करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

      दाजीपुर ते राधानगरी रस्त्याचे दुरुस्ती व नुतणीकरणाचे काम सुरु असल्याने दिनांक 10 मार्च ते 30 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करुन वाहतूक हलक्या व लहान वाहनांकरीता बालिंगा – महे पाटी-कोते- धामोड- शिरगाव- तारळे- पडळी- कारीवडे- दाजीपुर रस्ता प्रजिमा 29 चा वापर करण्याबाबत तसेच अवजड व मोठी वाहतुक या रस्त्यावरुन पूर्णपणे बंद करुन कोकणातुन कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा-नांदगाव-तळेरे-वैभववाडी-गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्याबाबत आदेशित केले आहे. तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता आंबोली-आजरा-गडहिंग्लज व संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा-आंबोली अशी वाहतुक वळविण्यात आली होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूरने गृहनिर्माण क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला

कोल्हापूरने गृहनिर्माण क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला  कोल्हापूर,महाराष्ट्र |:पं…