
no images were found
अबोली मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरची होणार एण्ट्री
स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत लवकरच सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरची एण्ट्री होणार आहे. याआधी अक्षयाने स्टार प्रवाहच्या साता जल्माच्या गाठी आणि तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. जवळपास ४ वर्षांनंतर अबोली मालिकेतून ती स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. सुप्रिया नागरगोजे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहे.
सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या खुनाचा प्रतीशोध घेण्यासाठी प्रयत्न करते आहे. तिला पूर्ण खात्री आहे की, पौर्णिमाचा घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात झालेला मृत्यू हा अपघाती नव्हे तर घातपात होता आणि हा सुनियोजित खून पोर्णिमाच्या सासू-सासऱ्यांनी केला आहे. परंतु हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाहीये अशावेळी अबोली आपल्याला आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देईल ह्या अपेक्षेने सुप्रिया अबोलीकडे येते. परंतु फटकळ आणि वाचाळ स्वभाव असलेल्या सुप्रियाच्या बोलण्यावर अबोलीचा विश्वासच बसत नाही. सुप्रिया आपल्या बहिणीला कसा न्याय मिळवून देणार? अबोली सुप्रियाला साथ देणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. तेव्हा नक्की पाहा अबोली रात्री ११ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.