Home राजकीय मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार – एकनाथ शिंदें

मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार – एकनाथ शिंदें

1 second read
0
0
105

no images were found

मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार – एकनाथ शिंदें

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेंच सुरु आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रि‍पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही. मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार आहे, असा निरोप एकनाथ शिंदेंनी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहचवला असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्यात किती तथ्य आहे, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे अशी भाजपची इच्छा आहे. याबाबत एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडची चर्चा देखील सुरु असल्याचं बोललं जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…