Home राजकीय एकनाथ शिंदे यांना भाजप कडून कडून दोन ऑफर!

एकनाथ शिंदे यांना भाजप कडून कडून दोन ऑफर!

0 second read
0
0
104

no images were found

एकनाथ शिंदे यांना भाजप कडून कडून दोन ऑफर!

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेते मंडळीकडून दोन ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यात पहिलं म्हणजे की उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल आणि दुसरं म्हणजे केंद्रात स्थान देण्यात येईल. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी वेगळी नावं सुचवलं जाण्याची शक्यता आहे. या ऑफरनंतर मुख्यमंत्र्यांनी भेटी-गाठी टाळल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन तयार होणाऱ्या सरकारमध्ये दिसणार की नाही हया प्रश्नावर चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
23 तारखेनंतर एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण एकत्रित झालेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलणे तसे टाळले आहे, तसेच आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांच्या मौनाचे नेमके काय कारण हे कळू शकले नसले तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…