no images were found
गोरगरीबांसाठी रुग्णसेवा आता होणार आणखी गतिमान
कोल्हापूर :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील यांच्या अभिनव संकल्पनेतून कोल्हापुरातील गोरगरीब वस्त्यांमध्ये मोफत फिरत्या रुग्णालयाची सुरुवात करण्यात आली आहे. एका सुसज्ज वाहनाच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा दिली जाते. शहरात विविध अशा 24 ठिकाणी हि रुग्णसेवा सुरु असून प्रत्येक ठिकाणी जवळपास १५० हून अधिक नागरिक या सेवेचा लाभ घेतात. या मोफत रुग्णालयाला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आणखी एका वाहनाचे लोकार्पण आज कोल्हापुरातील राजेंद्र नगर येथे करण्यात आले. कोल्हापूर शहरातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी आता दोन फिरत्या मोफत रुग्णालयांची व्यवस्था उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या योगदानातून झाली आहे.
या मोफत फिरत्या रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम, माजी नगरसेवक महेश वासुदेव, संग्रामसिंह निकम, सोमनाथ घोडेराव, दिलीप मैत्राणी, अभयकुमार वंटे, अभिजित पाटील, वैद्यकीय समन्वयक कक्षाचे राहूल चौगले, विजय पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.