Home आरोग्य कलाकारांनी सांगितले, त्‍यांच्‍या जेवणाच्‍या डब्‍यामध्‍ये काय असते!

कलाकारांनी सांगितले, त्‍यांच्‍या जेवणाच्‍या डब्‍यामध्‍ये काय असते!

2 min read
0
0
25

no images were found

कलाकारांनी सांगितले, त्‍यांच्‍या जेवणाच्‍या डब्‍यामध्‍ये काय असते!

आरोग्‍यदायी व पौष्टिक आहाराच्‍या सेवनामुळे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासोबत जीवनात यशस्‍वी होण्‍यास मदत देखील होऊ शकते. तुमच्‍या आवडत्‍या एण्‍ड टीव्‍ही कलाकारांच्‍या लंच बॉक्‍समध्‍ये काय असते याबाबत येथे सांगण्‍यात येत आहे. हे कलाकार आहेत स्मिता साबळे (धनिया, ‘भीमा’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा, ‘भाबीजी घर पर है’). एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भीमा’मध्‍ये धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्‍हणाल्‍या, ”माझा नेहमी विश्‍वास आहे की, फूड पोषण देण्‍यासोबत आनंदाचा स्रोत देखील आहे. माझ्या डब्‍यामध्‍ये पोषण व जुन्‍या आठवणींना ताज्‍या करणाऱ्या खाद्यपदार्थांचे उत्तम मिश्रण असते. मी डब्‍यामध्‍ये ज्‍वारीची भाकरी, हंगामी भाज्‍या आणि मसालेदार महाराष्‍ट्रीयन चटणी म्‍हणजेच घरी बनवलेला ठेचा सोबत घेऊन जाते. मी या आहाराचा आस्‍वाद घेतल्‍याशिवाय राहू शकत नाही. शूटिंगच्‍या दिवशी मी लहान डब्‍यामध्‍ये भिजवलेले बदाम व खजूर घेऊन जाते आणि शूटिंगदरम्‍यान ब्रेक मिळाल्‍यानंतर त्‍वरित ऊर्जेसाठी त्‍यांचे सेवन करते. माझे वडिल आजही मला घरी बनवलेले लोणचे व चटणी पाठवतात, ते मला बालपणीच्‍या आहाराची आठवण करून देतात. आणि हो, मी उन्‍हाळ्यादरम्‍यान सोबत कोकम सरबतने भरलेली लहान बॉटल घेऊन जाण्‍यास विसरत नाही. सेटवर थंड राहण्‍यासाठी हे सरबत अत्‍यंत उत्तम आहे.”   

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्‍हणाल्‍या, ”मी सेवन करणाऱ्या आहाराबाबत विशेष काळजी घेते, विशेषत: माझी त्‍वचा ऑइली आहे व पोट बिघडण्‍याची भिती असल्‍यामुळे खूप काळजी घेते. माझ्या टिफिनमध्‍ये संतुलित आहार असतो, ज्‍यामध्‍ये मिश्र धान्‍यांची चपाती, मोड आलेल्‍या कडधान्‍यांची भाजी आणि घरी बनवलेले दही असते. मी सकाळी फळ खाते व डिटॉक्‍स पाणी पिते, शूटिंगच्‍या ब्रेकदरम्‍यान मी फॉक्‍सनट्स किंवा भाजलेले चणे खाते. मला कधीकधी प्रयोग करायला आवडते, मी सोबत क्विनिआ खिचडी किंवा मूग डाळ पॅनकेक्‍स घेऊन जाते. आणि मला कूकिंग आवडत असल्‍यामुळे माझ्या डब्‍यामध्‍ये विविध चवींचे पदार्थ असतात, पण तेलकट पदार्थ नसतात. माझे सह-कलाकार माझा लंच बॉक्‍स उघडून मी बनवलेल्‍या नवीन आरोग्‍यदायी खाद्यपदार्थांबाबत जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करतात.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये मोहक विभुती नारायण मिश्राची भूमिका साकारणारे आसिफ शेख म्‍हणाले, ”माझा डब्‍बा म्‍हणजे लहान मेजवानीच (हसतात). मी आरोग्‍यदायी, घरी शिजवलेल्‍या आहाराचे सेवन करतो, ज्‍यामध्‍ये भाज्‍या, मिक्‍स डाळ करी आणि मिश्र धान्‍यांची चपाती यांचा समावेश असतो. मला काकडी, चेरी टोमॅटो, ऑलिव्‍ह आणि लिंबू असलेले सलाड खूप आवडते. मला माझ्या टीमसाठी स्‍प्राऊट्स चाट किंवा स्‍टफ केलेला पराठा असे आरोग्‍यदायी स्‍नॅक्‍स आणायला देखील आवडते. आरोग्‍यदायी आहाराच्‍या सेवनाबाबतीत कंटाळा केला नाही पाहिजे, म्‍हणून मी माझ्या डब्‍यामध्‍ये पौष्टिक व चविष्‍ट खाद्यपदार्थ असण्‍याची खात्री घेतो. शुक्रवारी बिर्याणी ही प्रथा बनली आहे, कारण प्रत्‍येकजण डब्‍यामध्‍ये या पौष्टिक खाद्यपदार्थाची वाट पाहत असतो. मी दिवसा हलक्‍या स्‍वरूपात आहार सेवन करतो, पण चवीबाबत तडजोड करत नाही. माझ्या टिफिनमध्‍ये नेहमी काय असते? माझ्या पत्‍नीने बनवलेली पुदीना चटणी, यामुळे आहार अधिक चविष्‍ट होतो. आणि हो, शूटिंग कितीही व्‍यस्‍त असो मी नेहमी वेळात वेळ काढून माझ्या सह-कलाकारांसोबत एकत्र आहाराचा आस्‍वाद घेतो. यामुळे खरे बॉडिंग दिसून येते.”  

Load More Related Articles

Check Also

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५” -राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु 

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५” -राष्ट्रीय स्तर…