
no images were found
स्कोडा ऑटो भारतात साजरे करत आहे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि जागतिक स्तरावर १३०वे वर्ष साजरे करत आहे
मुंबई, – स्कोडा ऑटो इंडियाचे रौप्य महोत्सवी वर्ष भारतातील न्यू एराला देखील साजरे करते, जेथे या उल्लेखनीय टप्प्यामध्ये भारतातील त्यांच्या २५ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद झाली आहे. मार्च २०२५ मध्ये स्कोडा ऑटो इंडियाने ७,४२२ युनिट्सची विक्री केली, जी भारतातील ब्रँडद्वारे आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री आहे. नवीन कायलॅक एसयूव्ही लाँच करण्यासह रणवीर सिंग कंपनीचे पहिले ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर हे यश संपादित करण्यात आले आहे, जेथे जागरूकता आणि विचारसरणीला चालना मिळत आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा या उल्लेखनीय विक्रीबाबत मत व्यक्त करत म्हणाले, ”नवीन कायलॅकच्या लाँचसह आम्ही भारतातील आमच्या प्रवासामध्ये ‘न्यू एरा’प्रती कटिबद्ध आहोत. मार्च २०२५ मध्ये आम्ही विक्री केलेल्या ७,४२२ कार्समधून या प्रवासाला मिळत असलेला आकार दिसून येतो, तसेच शाश्वत नियोजन, प्रयत्न आणि धोरणामुळे हा टप्पा गाठण्यात आला आहे, अधिकाधिक ग्राहकांना सक्षम करण्यासाठी आणि कायलॅकच्या यशाला साजरे करण्यासाठी आम्ही सुरूवातीची किंमत एप्रिल अखेरपर्यंत विस्तारित करण्याचे ठरवले.”
ग्राहकांसाठी अधिक सोयीसुविधा
ब्रँडने आतापर्यंत २८० पर्यंत आपल्या टचपॉइण्ट्सचे नेटवर्क देखील विस्तारित केले, जेथे यंदा ही आकडेवारी ३५० पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. स्कोडा ऑटो इंडियाने इनोव्हेशन्स देखील सादर केले, जसे फुली डिजिटलाइज्ड शोरूम्स, ऑनलाइन-ओन्ली सेल्स, अॅड-ऑन एनीटाइम वॉरंटी, सर्विस पारदर्शकता जसे स्कोडा सर्विस कॅम, स्पर्धात्मक मेन्टेनन्स खर्च आणि सर्विस किमतीमधील वाढीसंदर्भात संरक्षणासह स्कोडा सुपरकेअर. तसेच, स्कोडा ऑटो इंडियाने नुकतेच सर्व नवीन स्कोडा ग्राहकांसाठी एक-वर्ष कॉम्प्लीमेण्टरी सुपरकेअर मेन्टेनन्स पॅकेज सादर केले, ज्यामुळे ग्राहक व चाहत्यांसाठी सर्विस व मेन्टेनन्स खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.