no images were found
सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा होणार
महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी २८ मे हा त्यांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आता ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती २८ मे रोजी साजरी होते . हा दिवस ‘वीर स्मरण दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी म्हणजेच २८ मे रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेस राहुल गांधी यांनी काढलेल्या उद्गाराच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील आदर्श महापुरूष म्हणून ते आजही आदरणीय आहेत. , देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी वीर स्मरण दिन, म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी २८ मे हा त्यांचा जन्मदिवस राज्य शासनाने ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार या वर्षांपासून २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.