Home आरोग्य शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव

शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव

14 second read
0
0
16

no images were found

शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशसाक के.मंजूलक्ष्मी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार दि.1 मार्च 2025 पासून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहा.आयुक्त कृष्णात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले. आजअखेर शहातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव करण्यात आला आहे.

         महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 60 कर्मचा-यांमार्फत 476 लहान नाले, जेसीबीच्या सहाय्याने 236 मध्यम नाले व चॅनल सफाई करण्यात येत आहे. यामध्ये  दोन जेसीबी मशीनद्वारे कनाननगर, फुलेवाडी रिंगरोड, शिवशक्ति कॉलनी, अहिल्यादेवी होळकरनगर, ठोंबरे मळा, वेटाळे मळा, कसबा बावडा, सुर्वेनगर, टाकाळा, बिरेंजेपाणद, विक्रमनबर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, रामानंदनगर, कात्याणी कॉम्पलेक्स अशा 82 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तर मनुष्यबळाद्वारे चंद्रेश्वर, रंकाळा स्टँण्ड, रंकाळा तलाव, सानेगुरुजी वसाहत, कसबा बावडा, शुगरमिल, फुलेवाडी रिंग रोड, कसबा बावडा पूर्व, सदरबाजार, रमणमळा, नागाळापार्क, शास्त्रीनगर,, क्रातीसिंह नानापाटील नगर, सूर्वेनगर व हनुमान मंदिराजेंद्रनगर, नेहरुनगर,  राजारामपूरी, मातंगवसाहत, दौलतनगर, यादवनगर, मंगेशकरनगर, सिध्दाळागार्डन, साळोखेनगरर परिसर या 44 प्रभागातील 252 चॅनेलची सफाई पुर्ण करण्यात आली आहे. मोठया नाल्यांची सफाई करण्यासाठी 2 पोकलँड मशीनद्वारे जयंती नाला ते गाडीअड्डा व लक्ष्मीपूरी येथील नाल्यांची सफाई सुरु करण्यात आली आहे.

         तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …