
no images were found
महापालिकेमार्फत 20 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी):- देशामध्ये दि. 20 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राष्ट्रीय वंध्यत्व निवारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य विभाग व सिध्दगिरी जननी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिकांसाठी वंध्यत्व निवारण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दि.24 एप्रिल 2025 रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. यावेळी वंध्यत्व निवारणासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये तथांमार्फत वंध्यत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी इच्छुक पात्र नागरिकांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेस सिध्दीगिरी हॉस्पिटलमार्फत आय.यु.आय. करीता आवश्यक असणारी साधन सामुग्री देणगी स्वरुपात देण्यात येणार आहे. याचा लाभ शहरातील नागरिकांना निश्चितपणे होणार आहे. तरी या आरोग्य शिबीरास व व्याख्यानास शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.