no images were found
काँग्रेस सेवा दलाकडून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान
सांगली (रेखा दामुगडे) : सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंत दादा पाटील यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा काँग्रेसच्या सेवा दलाकडून सन २०११ पासून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. आज डेक्कन मॅन्युफॅक्चर हॉल येथे हा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री विशाल दादा पाटील ,महाराष्ट्र प्रदेश सेवा दल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष श्री सुदीपदादा चाकोते ,महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष श्रीमती शैलजाभाभी पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. हा पुरस्कार समाजा मधील जीवन गौरव, साहित्य भूषण, साहित्य रत्न, कलारत्न, आदर्श समालोचक ,समाज भूषण, समाज रत्न, आदर्श कार्यकर्ता, आदर्श सरपंच ,आदर्श विधी सेवा, आदर्श पोलीस अधिकारी ,आदर्श माता, आदर्श धन्वंतरी ,आदर्श सामाजिक संस्था, आदर्श प्रिन्सिपल, आदर्श शिक्षिका ,उद्योग भूषण, उद्योग रत्न, कृषी भूषण, कृषी रत्न, क्रीडाभूषण, क्रीडा रत्न, आदर्श पत्रकार, विशेष सत्कार असे अनेक पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाबरोबर अल्पसंख्याक सेलच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,उपसरपंच यांचा सत्कार ही सदर कार्यक्रमाबरोबर घेण्यात आला. उत्कृष्ट काम करून कर्तव्य करून निवडून आलेले काँग्रचे नेते आहेत. असे विशाल दादा पाटील म्हणाले.
सुदिपदादा चाकोते म्हणाले राहुल गांधी भारत जोडोचे काम सर्व धर्मियांना एकत्र आणण्याचे कार्य चांगले करत आहेत. देश का बल म्हणजेच हे सेवा दल आहे. कर्तुत्वावर निवडून येणे हे फकत काँगेस पक्षच करू शकते. या कार्यक्रमाचे स्वागत पैलवान प्रकाश जगताप पैगंबर शेख यांनी केले. प्रास्ताविक सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांनी केले व आभार देशभूषण पाटील यांनी मांडले.
यावेळी प्राध्यापक सिकंदर जमादार, पी एल रजपूत सर, सुभाष तात्या खोत, इंटकचे डी पी बनसोडे, अशोक सिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननताई मोहिते ,सुवर्णाताई पाटील, नंदाताई घोलप, आदिनाथ मगदूम, विठ्ठलराव काळे, नामदेव पाठारे इत्यादी बहुसंख्य सेवा दलाचे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सांगलीचे लोकप्रिय शाहीर देवानंद माळी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थीतासाठी पोवाडा सादर केला.