
no images were found
महानगरपालिकेच्या खाद्य महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्य दर वर्षी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी 52 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व दि.अ.यो.राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानामार्फत ताराबाई पार्क, सासणे ग्राऊंड येथे आजपासून रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 ते रात्रौ 9.00 वाजेपर्यंत या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या खाद्य महोस्तवात 80 महिला बचत गटांनी आपले स्टॉल लावले आहेत. येथे खाद्य पदार्थ बरोबरच महिला बचत गटानी बनवलेल्या विविध वस्तूंचीही विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील इतर नगर परिषद, नगरपालिकांमधील नावीन्य पूर्ण उत्पादने असणारे महिला बचत गटही यामध्ये सहभागी झाले आहेत.
या महोत्सवामध्ये महिला बचतगटांनी बनवलेल्या खाद्य पदार्थांचा 100 प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये मांसाहारी लोकांसाठी वडा कोंबडा, बिर्याणी रस्सा, तांबडा पांढरा रस्सा, चिकन 65, नॉन व्हेज रोल, खांडोळी, रक्ती मुंडी, सोलापूरी चिकन, मटण लोणचे तसेच शुध्द शाकाहारीमध्ये थाली पीठ, झुणका भाकरी, पुरण पोळी, विविध प्रकारची बिस्कीटे, आंबोळी, दावनगिरी डोसा, वडापाव, पकोडे, व्हेज रोल, पाणी पुरी, पिझ्झा, भेल, स्प्रिंग पोटॅटो, पापड, तिकट सांडगे, दाबेली अश्याप्रकारचे खाद्यपदार्थ या स्टॉलवर नागरीकांना खायावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचा-यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी स्पॉट गेम, फनी गेम ठेवण्यात आले आहेत.
या स्टॉलमध्ये शहरातील यशश्री, राजमाता, अष्टविनायक, उत्कर्ष, सितारे, आदिश्री, श्री गजलक्ष्मी, नृसिंह, हिमांगी, वैभवलक्ष्मी, मुक्ता, मंथरा, संघर्ष, मानिनी,ताज कृष्ण, आसावरी, सिंधु, श्री यशस्विनी, अल्फता, आझाद, श्री स्वामिनी, कृष्णाई, जान्हवी, परिवार, चैतन्य, श्री वैभवलक्ष्मी, श्री समर्थ, जान्हवी, श्री महालक्ष्मी, बालगणेश, वैभवलक्ष्मी, सावित्री, इंद्रायणी, यशस्वी, श्री राम समर्थ, अवनी, वीरमाता, वीरमाता, जय शिवराय, रमाई, छंद, शिवमती, विजयालक्ष्मी, दुर्गादेवी, माऊली फेरीवाले, संकल्प, स्वयंसिद्धा, अन्नपूर्णा, वैभव लक्ष्मी, धनलक्ष्मी, उजमा, वैभवलक्ष्मी, यशस्विनी, मैत्री, विश्वक्रांति, श्री स्वामी समर्थ, हिरकणी माता, मानसी, अन्नपूर्णा या बचत गटांनी भाग घेतला.
हा महोत्सव प्रशासक कार्तिकेयन एस, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश कांबळे, महिला व बालकल्याण अधिक्षक सौ.प्रिती घाटोळे, निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर, स्वाती शहा व अंजली सौंदलगेकर, वृषाली पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्टॉलला नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी केली असून मुलांनी या ठिकाणच्या विविध प्रकारच्या गेमचा आनंद घेत जल्लोष केला .तरी या स्टॉलला नागरीकांनी भेट देऊन या खाद्य महोत्सवातील विविध पदार्थांचा आनंद घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.