Home शासकीय अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

6 second read
0
0
36

no images were found

अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या लोकार्पण कार्यक्रमावेळी खासदार धनंजय महाडीक, शाहु महाराज छत्रपती, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, राहूल आवाडे, जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, आदी उपस्थित होते.

         कोल्हापूर शहरासाठी सुमारे ७ ते ८ टन आणि १८.५ टन अशी क्षमता असलेली २ यंत्रे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून मंजुर झाली आहे. राज्यात स्वच्छ भारत अभियान व केंद्र पुरस्कृत अमृत अभियान यशस्वीपणे राबविल्यामुळे वैयक्तिक शौचालय, भुमीगत गटार, मॅनहोल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भुमीगत व्यवस्थांमध्ये देखभाल दुरूस्ती करताना गॅस गळती तसेच प्रदुषित हवेमुळे काम करणाऱ्या मनुष्यबळास रोगराई होवु नये यासाठी याचा उपयोग होणार आहे. सदरचे मशिन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पाच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेस मंजुर झालेले आहे. या यंत्रापैकी सद्यस्थिती ७ ते ८ टन क्षमता असलेले १ यंत्र सद्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत आहे. तसेच १८.५ टन क्षमतेचे दुसरे संयंत्र सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेस उपलब्ध झालेले आहे. या यंत्राणा कार्यान्वीत करण्यासाठी शासन स्तरावरून संबधित यंत्र विकसीत करणाऱ्या कंपनी बरोबर करार केलेला आहे. या कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मनुष्यबळाव्दारे कोल्हापूर शहरातील मल वाहिन्या भुमीगत गटार व मल संकलन केंद्राची स्वच्छता करण्यात येणार आहे. शहरातील अंदाजे ८००० मॅनहोल, अंदाजे ५४ किलो मीटर मलवाहिन्या व भूमिगत गटारे आहेत. अमृत २.० अंतर्गत उपनगरे भागात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू असून यासर्व भुमीगत व्यवस्थेची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. या मशिनद्वारे दैनंदिन सरासरी 18 टन गाळ उठाव, किमान 100 मीटर पाईपवरील सक्शन खेचला जाणार आहे. सदरचे मशीन महापालिकेस प्राप्त झाल्यामुळे शहरातील ड्रेनेज लाईन मधील गाळ या अत्याधुनिक मशिनद्वारे काढण्यास मदत होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र :’राज्यशास्त्रातील नवीन प्रवाह’ यावर होणार विचार मंथन

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर…