no images were found
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर:”ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली! महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाला संशोधनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि इतिहास संशोधन क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
सरांनी मराठेशाहीचा इतिहास, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर केलेलं महत्त्वपूर्ण संशोधन आजच्या पिढीसाठी एका वैचारिक दिशादर्शकासारखे आहे. सरांनी केवळ तारखा आणि घटनांचा इतिहास मांडला नाही, तर त्यामागचे जीवनमूल्ये आणि सामाजिक दृष्टिकोन तरुणांसमोर आणले. इतिहास हा केवळ ‘भूतकाळ’ न ठेवता तो ‘भविष्यासाठी मार्गदर्शक’ कसा ठरेल, याची शिदोरी आजच्या पिढीला सरांनी दिली आहे.
डॉ.जयसिंगराव पवार सरांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ‘एक निष्कलंक आणि ऋषीप्रत’ पर्व संपले आहे. ही पोकळी भरून काढणे अशक्य असले तरी, त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि मांडलेले विचार येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशा देत राहतील, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पवार कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो…!!