no images were found
आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरेंसचे नवीन दीर्घकालीन बचत
* ग्राहकांना करमुक्त उत्पन्नाची हमी आणि मॅच्युरिटी कॉर्पस एक रकमी देणारे एक अष्टपैलू बचत उत्पादन * ‘सेविंग्स वॉलेट’ हे पर्याय उत्पन्न जमा करून जमलेली एकूण रक्कम पोलिसीच्या कालावधीमध्ये कोणत्याही वेळी काढून घेता येण्याची लवचिकता देते. * ‘सेव्ह द डेट’ हे वैशिष्ठ्य एक विशेष महत्व असलेल्या तारखेला ग्राहकांना खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्यास मदत करते. * स्त्रियांना त्याच वयाच्या पुरुषांपेक्षा जास्त मॅच्युरिटी लाभ मिळतील.
मुंबई : आय सीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरेंसने ‘आयसीआयसीआय प्रु सुख समृद्धी’ या एका नवीन पार्टीसिपेटींग बचत योजनेचे उद्घाटन केले; जी ग्राहकांना खात्रीशीर लाभ आणि बोनस च्या रूपाने वाढ असा दुहेरी फायदा देते. या शिवाय कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देत पॉलिसीची एकूण रक्कम (लाइफ कव्हर) पॉलिसीच्या उत्पन्न काळासह संपूर्ण कालावधीसाठी राहील. स्त्रियांना आर्थिक बचतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी आर्थिक दृष्टीने स्वतंत्र व्हावे यासाठी ही नवीन योजना स्त्रियांना जास्त मॅच्युरिटी लाभ देते. ग्राहकांच्या वेगवेगळया आर्थिक गरजा पुरविण्यासाठी ही दीर्घकालीन बचत योजना दोन प्रकरांमध्ये उपलब्ध आहे- उत्पन्न स्वरूपात आणि एक रकमी.
आयसीआयसीआय प्रु सुख समृद्धी- उत्पन्न: मुलांचे शिक्षण, वार्षिक सुट्टी, प्रवास किंवा एखाद्या घरगुती कामासाठी लागणाऱ्या पैश्यांची गरज भागविण्यासाठी टॅक्स मुक्त, खात्रीशीर उत्पन्नाचा एक जोड मार्ग निर्माण करणारे एक उत्तम साधन. ही योजना खरेदी करताना जो कालावधी निवडला असेल त्या काळासाठी हा पर्याय ग्राहकांना खात्रीने नियमित उत्पन्न मिळवून देते. त्याशिवाय ग्राहकांना एक रकमी मॅच्युरिटी लाभ सुद्धा मिळतो.
‘सेव्हिंग वॉलेट’ या नवीन वैशिष्ठ्यामुळे ग्राहकांना उत्पन्न एकत्र जमा करणे आणि वाढविणे शक्य होणार आहे. जमलेली एकूण रक्कम ‘सेव्हिंग वॉलेट’ मधून पॉलिसी काळामध्ये कधीही थोडी किंवा पूर्ण काढता येईल. हे वैशिष्ठ्य ग्राहकांना त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते.
याशिवाय, ‘सेव्ह द डेट’ या अनोख्या वैशिष्ठयामुळे ग्राहक त्यांनी निवडलेल्या तारखेला उत्पन्न मिळणे सुरू करू शकतात. जन्म दिवस, लग्नाचा वाढदिवस अशा विशेष दिवसांना संस्मरणीय करण्यासाठी या तारखा ते उत्पन्न मिळण्यासाठी निवडू शकतात.
आयसीआयसीआय प्रु सुख समृद्धी- एक रकमी: जे ग्राहक दीर्घकाळ गुंतवणूक करून नवीन घर विकत घेणे किंवा मुलांचे उच्च शिक्षण अशा मोठ्या खर्चाचे ध्येय ठेऊन एकदम मोठी रक्कम मिळावी यासाठी पॉलिसी घेणार असतील अशा ग्राहकांसाठी एक रकमी हा प्रकार आहे.
आयसीआयसी आय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरेंस चे मुख्य वितरण अधिकारी,श्री. आमित पल्टा म्हणाले की, “ मुलांचे शिक्षण किंवा घर बांधणे अशी मोठी आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी चोख नियोजन आवश्यक असते. आय सी आय प्रु सुख समृद्धी हे खासकरून ग्राहकांच्या अशा आर्थिक उद्दिष्टांना पूर्णत्व देण्यासाठी बनवले आहे.
गेली दोन-तीन वर्षे ही सर्वांसाठी फार आर्थिक आव्हानांची होती. त्यामुळे ग्राहक अशा बचत उत्पादनांना प्राधान्य देत आहेत जी हमीपूर्वक आर्थिक उद्दिष्टांना पूर्ण करू शकतील. मॅच्युरिटी रकमेची लौकर दृश्यमानता ग्राहकांना त्यांचे जीवन चांगले नियोजित करण्यासाठी सुसज्ज करते. आयसीआयसीआय प्रु सुख समृद्धी केवळ खात्रीशीर मॅच्युरिटी लाभ आणि वार्षिक बोनसच ( जसे आणि घोषित केले तेव्हा) देईल असे नाही तर ते जमलेल्या एकूण रकमेला अजून मजबूत करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. ‘सेव्हिंग वॉलेट’ आणि ‘सेव्ह द डेट’ सारखे अनोखे विशिष्ट्ये असलेले हे बहू उपयोगी बचत उत्पादन ग्राहकांना बदलत्या आर्थिक गरजांच्या वेळेस आणि जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर लाइफ कव्हर च्या माध्यमातून आर्थिक सुरक्षितता देऊन त्यांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांना साजरे करण्यास सक्षम करते.