no images were found
संजय मिश्रा आणि विनीत कुमार यांनी रोहिताश्व गौडला वाचवले!
बॉलिवुडच्या ग्लॅमरस विश्वामध्ये अनेकदा पडद्यामागे खरे शौर्य पाहायला मिळते. असेच काही रोहिताश्व गौड यांच्याबाबतीत घडले, जे एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गौड यांनी नुकतेच त्यांच्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमधील भयानक अनुभवाबाबत सांगितले, जेथे त्यांचे जिवलग मित्र व प्रतिष्ठित अभिनेते संजय मिश्रा आणि विनीत कुमार यांनी त्यांचा जीव वाचवला होता. या घटनेबाबत सांगताना रोहिताश्व गौड म्हणाले, ”तो १९९० चा काळ होता, संजय, विनीत आणि मी मुंबईतील सांताक्रूझ येथे विमानतळाजवळील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होतो. कडक उन्हाळ्याचे दिवस होते, रात्रीच्या वेळी घरमालकाच्या मुलाची बर्थडे पार्टी सुरू होती, ज्यामुळे उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आम्ही घराच्या छतावर झोपण्याचे ठरवले. आम्हाला छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीमधून पाणी गळती होत असल्याचे माहित नव्हते. विमान उडण्याचा सतत आवाज येत असताना देखील आम्हाला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला घातक वास्तविकतेचा सामना करावा लागला. मला हालचाल करता येत नव्हती. काहीतरी चुकीचे घडले आहे असे संजय आणि विनीत यांना जाणवले. त्यांना मला उभे करून चालवण्यास संघर्ष करावा लागला, पण त्यांचा निर्धार अतूट होता. ते मला वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की रात्रभर माझा पाठीचा कणा पाण्यात राहिला होता, ज्यामुळे माझी स्थिती जवळपास अर्धांगवायू झाल्यासारखी होती. माझ्या मित्रांनी वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर माझी स्थिती गंभीर होती. तो अत्यंत भयानक अनुभव होता, पण संजय व विनीत यांनी केलेली त्वरित कृती व पाठिंब्यामुळे मी त्या स्थितीमधून वाचू शकलो.” अभिनेते पुढे म्हणाले, ”या घटनेनंतर मला बरे होण्यास खूप वेळ लागला आणि वेदना देखील खूप झाल्या. म्हणून मी मुंबईवरून माझ्या मूळगावी परतलो, जेथे अनेक महिने बेड रेस्ट घेतली. मी पूर्ण बरे झाल्यानंतर दिल्लीमधील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा रेपीर्टरी कंपनीमध्ये सामील झालो. तेथे मी सहा वर्ष माझे कौशल्य अधिक निपुण केले आणि १९९७ मध्ये मुंबईमध्ये परत येऊन माझ्या करिअरला नव्याने सुरूवात केली. तो अनुभव माझ्या मनात खोलवर रुजला. त्या आव्हानात्मक काळात संजय व विनीतने मला केलेली मदत माझ्या मनात आजही आहे, ज्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहिन. मी माझ्या अंत:करणापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. शत्रुत्व व स्पर्धेच्या कथांचे वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीमध्ये मैत्री व शौर्याची ही गाथा सखोल नात्याची आठवण करून देते, जी ग्लॅमरस मनोरंजन क्षेत्रात अधिक दृढ होऊ शकते.”