no images were found
सीरत कपूर च्या दिग्दर्शनाच्या आकांक्षा! शिकत आहे दिग्दर्शन आणि मेक–अपबद्दल
झी टीव्हीवरील ‘रब से है दुआ’मध्ये मन्नतच्या रूपात सीरत कपूर आपल्या प्रेक्षकांचे मन जिंकत असून नवीन कौशल्ये शिकून मनोरंजनाच्या उद्योगात स्वतःला सर्वगुणसंपन्न प्रोफेशनल बनवण्यासाठी ती सेटवर आपल्या वेळेचा स्मार्ट उपयोग करत आहे. ही गुणी अभिनेत्री दिग्दर्शनाची कला शिकत असून ती मॉनिटरच्या मागे बसते आणि आपले दिग्दर्शक व डीओपी टीमसोबत विभिन्न अँगल्स आणि प्रकाशयोजनेबद्दल चर्चा करते. ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून ती मालिकेच्या विभिन्न क्षेत्रांमध्ये सहभागीच होत नाही तर ह्या तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञानही प्राप्त होत आहे. असं दिसतंय की सीरतला एक दिवस दिग्दर्शक बनण्याची आकांक्षा आहे.
दिग्दर्शनाच्या व्यतिरिक्त, सीरत सेटवर सर्वांनाच मदत करताना दिसून येत आहे. तिला वेळ असेल तर ती हेअर आणि मेकअप आर्टिस्ट्सनाही मदत करते. सीरत आपल्या कौशल्यांमध्ये भर टाकत असून आपल्या कामाच्या पलीकडे जाण्याच्या तिच्या प्रयत्नांबद्दल अख्खी टीम तिचे कौतुक करत आहे आणि अर्थातच त्यामुळे मालिकेच्या एकूणच यशामध्ये भर पडत आहे.
सीरत म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून कॅमेऱ्याच्या लेन्सच्या मागे खरोखर काय चाललेले असते याबद्दल मला कायमच खूप कुतूहल राहिलेले आहे. ‘रब से है दुआ’च्या सेटवर मला ही संधी मिळाली. मॉनिटरमध्ये पाहणे अतिशय रोचक आहे कारण त्यामुळे गोष्टी आणि व्यक्तिरेखांबद्दल अतिशय वेगळा दृष्टीकोन प्राप्त होतो. दिग्दर्शकाची कौशल्ये शिकल्यामुळे मला माझ्या अभिनयाची कौशल्ये सुधारण्यामध्येही मदत होते. प्रत्येक दृश्य अचूक बनण्यासाठी दिग्दर्शन टीम घेत असलेल्या प्रयत्नांची जाणीव आपल्याला होते. ह्या अनुभवाने माझ्या केवळ फिल्ममेकिंगच्या ज्ञानात भर टाकलेली नसून अख्ख्या क्रूबद्दल माझ्या मनातील आदर दुणावला आहे आणि त्यामुळे मला ह्या उद्योगाच्या विभिन्न बाबी जाणून घेण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.”
‘रब से है दुआ’च्या सेटवर ही नवीन कौशल्ये सीरत शिकत असताना हल्लीच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कशी मन्नत आपल्या परिवाराच्या विरोधात जाते आणि फरहान (आरव मल्होत्रा) सोबत पळून जाते आणि मग तिला कळते की तो तिच्यासोबत केवळ तिचे पैसे आणि दागिन्यांसाठी असतो. दुसऱ्या बाजूला सुभान (धीरज धूपार) आणि इबादत (येशा रूघानी) हे मन्नतला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुभानबद्दलचे प्रेम आणि निकाहच्या वेळेस जेव्हा ती मन्नतसोबत खोटे बोलली तेव्हा तिचे मन साफ होते हे आपल्या परिवाराला पटवून देण्यामध्ये इबादतची कशी ओढाताण होते ते पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रोचक ठरेल.