Home मनोरंजन  “मी फक्त एक खलनायिका नाही; उत्कर्षा नाईक

 “मी फक्त एक खलनायिका नाही; उत्कर्षा नाईक

8 second read
0
0
20

no images were found

   “मी फक्त एक खलनायिका नाही; उत्कर्षा नाईक

 

सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेत युविका महाजन (अंजली तत्रारी)ची कहाणी आहे, जी आपला वारसा हक्क मिळवण्यासाठी पारंपरिक संकेतांशी लढा देत आहे. या गंभीर नाट्याला एक हलकेफुलके वळण मिळते, जेव्हा पडद्यावर सृष्टी वर्माची दुष्ट, कुटिल भूमिका साकारणारी अभिनेत्री उत्कर्षा नाईक आपल्या भूमिकेला विनोदी स्पर्श देते. आणि त्यामुळे पडद्यामागचे वातावरण देखील मस्तीचे होऊन जाते.

या मालिकेत सृष्टी वर्मा हे एक नाकारात्मक पण थोडे गंमतीशीर पात्र साकारणारी उत्कर्षा नाईक आपल्या संवादात आणि पटकथेत उत्स्फूर्तपणे काही गंमतीजमती करते, ज्यामुळे सेटवरचे वातावरण हलकेफुलके होऊन जाते. एक चतुर, कुटिल आणि प्रभावी राजकीय फिक्सरची भूमिका करत असलेल्या उत्कर्षाने सेटवरचा एक गंमतीदार किस्सा सांगितला, जेव्हा सेटवरचे सगळे कलाकार आणि इतर मंडळींची हसून हसून पुरेवाट झाली होती. एका दृश्यात, डीजेच्या योजनेचा एक भाग म्हणून त्याची आई गार्गी (परिणिता सेठ) आपली मुलगी मिराया (गीतांजली मंगल) आणि सुरक्षा कर्मीचा मुलगा निखिल (आर्यन अरोरा) यांच्या लग्नाला पाठिंबा देण्याचे नाटक करते. या लग्नाच्या दृश्यात, मिराया काही अक्षता उधळते आणि तिची आई म्हणून सृष्टीने त्यातील काही अक्षता तिच्या पदरात झेलायच्या असा एक विधी असतो. पण, उत्कर्षा नेहमीच उत्स्फूर्तपणे काहीतरी गंमत करत असते. यावेळी तिने जमिनीवर पडलेल्या अक्षता उचलून धमाल उडवली. तिची ती कृती पाहून स्पॉट दादापासून लाइटमॅनपर्यंत सगळे जण हसू लागले!

सृष्टी वर्मा या एका भ्रष्ट राजकारण्याची भूमिका करणारी उत्कर्षा नाईक म्हणते, “मला सृष्टी वर्माच्या भूमिकेत काही तरी नवे करायला आवडते, कारण ती काही फक्त नकारात्मक भूमिका नाही. त्यात खूप रंजक क्षण देखील आहेत. सृष्टीचे काम करत असताना बऱ्याचदा असा विनोद होतो, कारण मी आयत्या वेळी दृश्यात काही तरी बदल करते. कलाकार आणि इतर सदस्यांना या व्यक्तिरेखेतील गंमतीदार बाजू आवडते आणि अचानक काही तरी करण्याच्या तिच्या स्वभावामुळे त्यांना मजा येते. सृष्टी वर्मा पडद्यावर जिवंत करताना आणि हे गंमतीदार क्षण सेट्सवर सगळ्यांसोबत शेअर करताना खरोखर फार मजा येते”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…