Home मनोरंजन  ‘बादल पे पांव है’ लवकरच सोनी सबवर!

 ‘बादल पे पांव है’ लवकरच सोनी सबवर!

6 second read
0
0
16

no images were found

 ‘बादल पे पांव है’ लवकरच सोनी सबवर!

 

ज्या महिला आपल्या आयुष्यात काही तरी मोठे साध्य करण्याची आकांक्षा बाळगतात, त्यांना बऱ्याचदा ‘लोभी’ म्हटले जाते. सोनी सबवरील आगामी मालिका ‘बादल पे पांव है’ बानी (अमनदीप)च्या प्रेरणादायी कहाणीतून ही चाकोरी मोडण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेतील नायिका बानी, जीवनात अनेक मर्यादा असून स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अधिक चांगले जीवन मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करणारी तरुणी आहे. टेलिव्हिजनसाठी हा काहीसा नवा विषय आहे, ज्यात आपल्या कक्षा विस्तारीत करून अधिक चांगले जीवनमान प्राप्त करण्याचा एक धाडसी आणि प्रासंगिक विचार आहे. ‘बादल पे पांव है’ ही मालिका सरगुन मेहता आणि रवी दुबे या दमदार निर्मात्यांची निर्मिती आहे.

मालिकेची नायिका बानी आहे. मध्यमवर्गीय बानी, जिला आपल्या दैनंदिन आवश्यकतांसाठी देखील झगडावे लागते, ती या अडथळ्यांपेक्षाही मोठी स्वप्नं बघते. महत्त्वाकांक्षी आणि उत्साही बानीच्या मते जीवनाकडून मोठ्या अपेक्षा करणे काही गैर नाही, उलट स्वप्न साकार करण्याच्या आणि आपले जीवनमान सुधारण्याच्या दिशेने उचललेले ते पहिले पाऊल आहे. बानीच्या आकांक्षा वाढत जातात आणि ती नकळत स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगच्या गतिशील आणि पुरुषप्रधान क्षेत्रात पाऊल टाकते. ‘बादल पे पांव है’ मध्ये बानीचे बलिदान, तिचा संघर्ष, स्वप्न सत्यात उतरवण्याची तिची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि तिच्या धाडसी वाटचालीचे चित्रण आहे.

पंजाबच्या समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमीवरील या कहाणीतील बानीची व्यक्तिरेखा येथील परंपरा आणि मूल्ये यांचे जतन करणारी आहे. आपला दुर्दम्य आशावाद आणि अफाट ऊर्जा यांनी सळसळणारी बानी नक्कीच संकटांना न घाबरता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा प्रेक्षकांना देईल!

‘बादल पे पांव है’ ची निर्माती सरगुन मेहता

“‘बादल पे पांव है’ मालिकेची निर्मिती हा माझ्यासाठी कृतकृत्य करणारा प्रवास आहे. ही मालिका माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळ आहे, कारण त्यात चिकाटी आणि आशा या गुणांचे महत्त्व दाखवून दिले आहे. अनेक महिलांनी शेअर मार्केटच्या विश्वात कसे बस्तान बसवले आहे, हे पाहून मी अचंबित होते. कारण हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात मुशाफरी करणाऱ्या एका महिलेची कहाणी मला टेलिव्हिजनवर आणायची होती. पंजाबशी माझे घट्ट नाते आहे आणि येथील मातीचा सुगंध, संस्कृती आणि लोक यांना आमच्या मालिकेत आम्हाला स्थान द्यायचे होते. प्रत्यक्ष लोकेशनवर जाऊन शूटिंग केल्यामुळे त्यात अस्सलता आली आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल. मला आशा आहे की, ही कहाणी प्रेक्षकांना आपलीशी वाटेल आणि त्यांना स्वतःवर विश्वास ठेवून आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रेरित करेल.”

बानी अरोराची भूमिका करणारी अमनदीप सिद्धू

“‘बादल पे पांव है’ या पंजाबच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या मालिकेत काम करताना घरी आल्यासारखे वाटले. मी स्वतः सरदारनी असल्यामुळे, येथील संस्कृती, लकबी, बोलण्याचा ढंग, भाषेतील बारकावे माझ्यासाठी स्वाभाविक आणि सहज आहेत. त्यामुळे, बानी साकार करण्याचा अनुभव धन्यता देणारा आहे. खऱ्याखुऱ्या लोकेशन्सवर आणि पंजाबातल्या सुंदर शेतांमध्ये शूटिंग केल्यामुळे मालिकेला अस्सलतेचा स्पर्श मिळाला आहे. आणि या प्रत्येक क्षणातून मला आनंद मिळाला आहे. अडचणींवर मात करून स्वप्नांचा पिच्छा पुरवण्याचे बानीचे असामान्य धैर्य आणि दृढनिश्चय या बाबतीत माझे तिच्याशी बरेचसे साधर्म्य आहे. मला खात्री आहे की, तिची कहाणी प्रेक्षकांना कितीही अडचणी आल्या तरी, त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देईल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…