
no images were found
दिल्ली आकाशवाणीवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन
मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दूरदर्शनवर पहिले वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द गाजविणारे हे डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे सकाळी मुलुंड येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
ते दिल्ली आकाशवाणी व मुंबई दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक होते. पुढील काळात त्यांनी याच केंद्रासाठी संचालकपद भूषविले. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते. त्यांचा ‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रम अतिशय गाजला. त्याकाळात मेहेंदळे दूरदर्शनवरील ‘वाद संवाद’ कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक नाटकांतही भूमिका केल्या आहेत. आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह अशा १८ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.