no images were found
भारतामधील पहिला सीएनजी-संचालित ट्रक टाटा मोटर्सतर्फे लॉन्च
मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने भारतातील पहिला सीएनजी-संचालित मेडियम अॅण्ड हेवी कमर्शियल वेईकल (एमअॅण्डएचसीव्ही) ट्रक लॉन्च करत पुन्हा एकदा नवीन ट्रकिंग इतिहास रचला आहे. तसेच कंपनीने ड्रायव्हिंग सोयीसुविधा वाढवण्यसाठी आधुनिक अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टिम (एडीएएस) सादर करण्यासोबत त्यांच्या प्राइमा, सिग्ना व अल्ट्रा ट्रक्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या श्रेणीमध्ये जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांची भर केली आहे. सर्वसमावेशक बहु-उपयोगी गरजा, विशेषत: झपाट्याने वाढत असलेल्या लॉजिस्टिक्स व पायाभूत सुविधा विभागांच्या गरजांची पूर्ततता करण्यासाठी प्रगत इंटरमीजिएट अॅण्ड लाइट कमर्शियल वेईकल (आयअॅण्डएलसीव्ही) ट्रिपर्स व ट्रक्सची नवीन सिरीज देखील लॉन्च करण्यात आली.
विभाग व अॅप्लीकेशन्समधील मालवाहतूक व बांधकाम परिवहनाच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी विकसित व नाविन्यपूर्णरित्या डिझाइन करण्यात आलेले अत्याधुनिक ट्रक्स आज टाटा मोटर्सचे स्थापित ‘पॉवर ऑफ ६’ बेनीफिट तत्त्व अधिक सुधारित करण्यासाठी लॉन्च करण्यात आले. या बेनीफिट तत्त्वाचा उच्च उत्पादकता आणि कमी टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप (टीसीओ) ड्रायव्हिंग ताफा लाभ देण्याचा मनसुबा आहे.
टाटा मोटर्सच्या ट्रक्सची एमअॅण्डएचसीव्ही व आयअॅण्डएलसीव्ही श्रेणी अधिकतम ताफा व्यवस्थापनासाठी नेक्स्ट-जनरेशन डिजिटल सोल्यूशन फ्लीट एजसह येते. सेवा ऑफरिंग्जचा बकेट संपूर्ण सेवा ऑन-साइट सपोर्ट, अपटाइम अॅश्युरन्स, ब्रेकडाउन असिस्टण्स, विमा व अपघाती दुरुस्ती, विस्तारित वॉरंटी आणि वाहन देखभाल व लाइफसायकल व्यवस्थापनासाठी इतर अतिरिक्त सेवा प्रदान करते.