no images were found
आदित्य बिर्ला तर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि विमा जागरूकता शिबिराचे आयोजन
कोल्हापूर : आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एबीएसएलआय द कंपनी) या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या (एबीसीएल) जीवन विमा उपकंपनीने जीवन विम्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी खास उपक्रम जाहीर केला आहे. इन्शुरन्स रेग्युलरेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (इर्डा) राज्य विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आघाडीची जीवन विमा कंपनी या नात्याने कंपनीने इचलकरंजी- कोल्हापूर, महाराष्ट्र येथे मोफत तपासणी आणि विमा जागरूकता शिबिराचे आयोजन केले आहे.
जीवन विम्याविषयी जागरूकता पसरवणे हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कोल्हापूर येथील सरस्वती हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी शिबिरात सहभागींची मोफत आरोग्य तपासणी केली. एबीएसएलआयने विम्याच्या विविध फायद्यांची माहिती देणाऱ्या आणि योग्य विमा पर्यायांच्या मदतीने आर्थिक भविष्य कसे सुरक्षित करता येईल हे सांगणाऱ्या पत्रकांचेही यावेळी वाटप केले.गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात २५० पेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली.
ईर्डाच्या राज्य विमा योजनेचा एक भाग म्हणून देशात आर्थिक जागरूकता पसरवण्यासाठी आणि विम्याचा वापर वाढावा म्हणून एबीएसएलआय पुढील वर्षभरात महाराष्ट्रात अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना विम्याची तसेच कशाप्रकारे आपल्या कुटुंबाचे आर्थिक आरोग्य जपता येईल याची पुरेशी माहिती मिळेल.