Home सामाजिक एनआयटीमध्ये रक्तदान शिबीर

एनआयटीमध्ये रक्तदान शिबीर

2 second read
0
1
129

no images were found

 

एनआयटीमध्ये रक्तदान शिबीर

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले. विद्यार्थी व स्टाफनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक, अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेचे रूग्ण आदींच्या जीवीताच्या रक्षणासाठी रक्तदान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नमुद केले. त्यांनी वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटरचे संचालक धनंजय साळोखे यांचे स्वागत केले. प्रा. किरण वळीवडे यांनी वैभवीलक्ष्मीच्या सर्व स्टाफचे स्वागत केले. मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. एनआयटीच्या सोशल क्लबचे समन्वयक प्रा. रविंद्र यादव यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. मेकॅनिकल व इलेक्ट्रीकलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…