
no images were found
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई. यांची कोल्हापुरात विशेष यकृत व पाचनतंत्र संबंधित ओपीडी सेवा सुरू
कोल्हापूर – नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई यांनी आज कोल्हापूरमधील रामानमळा येथील ‘अंतरंग हॉस्पिटल’ सोबत भागीदारीतून हेपेटोलॉजी (यकृत रोग) आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (पचनसंस्था) ओपीडी सेवा सुरू केल्याची घोषणा केली. या सेवांचा उद्देश यकृताशी संबंधित आजारांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रगत उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळू शकतील.
डॉ. गौरव चौबल, संचालक – एचपीबी सर्जरी, लिव्हर व मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट विभाग, नानावटी मॅक्स हॉस्पिटल, हे दर महिन्याच्या चौथ्या बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अंतरंग हॉस्पिटल, रामानमळा, कोल्हापूर येथे उपलब्ध असणार आहेत.
लिव्हर फेल्युअरची लक्षणे म्हणून डॉ. चौबल यांनी पुढील बाबींकडे लक्ष वेधले: वारंवार ताप येणे, पिवळा पडणे (पीलिया), गडद रंगाचा लघवी, फिकट रंगाचा विष्ठा, पोट फुगणे, कारण नसताना वजन कमी होणे, तीव्र थकवा, सतत उलट्या होणे आणि त्वचेवर सहज जखमा किंवा निळसर डाग पडणे – ही सर्व लक्षणे लक्षात घेऊन त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
कोल्हापुरातील या नवीन ओपीडी सेवा नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या भारतभर गुणवत्तापूर्ण आणि सुलभ आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देतात. आरोग्य ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे, आणि ती संसाधनांअभावी किंवा माहितीअभावी दुर्लक्षित होऊ नये, हीच संस्थेची प्रमुख भूमिका आहे.