
no images were found
नथिंगच्या या सबब्रँडने तीन एअरबड्ससह सेकंड-जनरेशन स्मार्टफोन सादर केले
नथिंग या लंडनस्थित टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएमएफ या सबब्रँडने आज चार नव्या उत्पादनांची घोषणा केली. या ब्रँडतर्फे सीएमएफ फोन 2 प्रो, बड्स 2, बड्स 2 प्लस आणि बड्स 2a ही उत्पादने सादर करण्यात आली आहेत.
नथिंगने या वर्षाची सुरुवात दमदार केली. काऊंटरपॉईंट रिसर्च क्यू१ २०२५ इंडिया स्मार्टफोन शिपमेंट अहवालानुसार या तिमाहीत हा ब्रँड भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रँड आहे. या काळात ब्रँडने मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय १५६ टक्के वाढ अनुभवली. सलग पाचव्या तिमाहीत नथिंगने सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्रँड हे आपले स्थान कायम राखले आहे. या यशामुळे नथिंग हा भारतीय बाजारपेठेत मागील दशकभरात हे यश गाठणारा एकमेव ब्रँड ठरला आहे.
सीएमएफ फोन 2 प्रोमध्ये या विभागातील सर्वोत्कृष्ट थ्री कॅमेरा प्रणाली, अप्रतिम ब्राइट डिस्प्ले आणि प्रीमिअम डिझाइन असल्याने सीएमएफ फोन 2 प्रो दैनंदिन वापरासाठी अप्रतिम स्मार्टफोन आहे. फक्त ७.८ मिमी. जाड आणि १८५ ग्रॅ. वजन असलेला हा फोन नथिंगचा आजवरचा सगळ्यात पातळ आणि हलक फोन आहे. सीएमएफ फोन 1 च्या तुलनेत हा ५ टक्के पातळ आहे. हा फोन पांढरा, काळा, केशरी आणि हलका हिरवा अशा चार पर्यायांमध्ये अनोखी फिनिश आणि टेक्श्चरसह उपलब्ध आहे.