Home सामाजिक वॉर्डविझार्ड तर्फे अनुफुड इंडिया २०२३ मध्ये नाविन्यपूर्ण होरेका श्रेणीचे प्रदर्शन

वॉर्डविझार्ड तर्फे अनुफुड इंडिया २०२३ मध्ये नाविन्यपूर्ण होरेका श्रेणीचे प्रदर्शन

6 second read
0
0
87

no images were found

वॉर्डविझार्ड तर्फे अनुफुड इंडिया २०२३ मध्ये नाविन्यपूर्ण होरेका श्रेणीचे प्रदर्शन
 
 
कोल्हापूर,  – वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड या खाद्यपदार्थ क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एका कंपनीने आज अनुफूड इंडिया २०२३ या प्रतिष्ठित बीटुबी आणि एक्स्पोर्ट कार्यक्रमात सहभागी होत असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमाची आजपासून सुरूवात होत असून तो ७ ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.
कंपनीने होरेका (हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग) उत्पादन श्रेणी या प्रदर्शनात उपलब्ध करत असून त्यात सॉसेस, मसाले, रेडी-टु-इट (आरटीई) मील्स, फ्रोझन फुड यांचा समावेश आहे. अनुफूड इंडिया २०२३ हा या क्षेत्रातील व्यावसायिकांना खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, ‘अनुफूड इंडिया २०२३ मध्ये सहभागी होत या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी होरेका श्रेणी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. खाद्यपदार्थ क्षेत्र सातत्याने बदलत असून अनुफूड इंडिया २०२३ मधील आमचा सहभाग देशांतर्गत व परदेशातील मोठ्या ग्राहकवर्गाला सेवा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कंपनी भागधारकांशी संवाद साधण्यासाठी व एकमेकांच्या सहकार्याने खाद्यपदार्थ क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहे. दर्जा व ग्राहक समाधानाप्रती आमची बांधिलकी हा आमच्या कामाचा केंद्रबिंदू आहे आणि कंपनीची नवी उत्पादने सर्वांना उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे.’ 
बिझनेस-टु-बिझनेस (बीटुबी) संवाद आणि निर्यातीच्या संधींवर भर देणाऱ्या अनुफूड इंडियाचे महत्त्व वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसला समजते. कंपनी होरेका श्रेणी उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक असून त्यात दर्जेदार सॉसेस, मसाले, सोयीस्कर रेडी-टु-इट (आरटीई) मील्स, रूचकर फ्रोझन फुड यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील व्यावसायिकांशी भेटण्यासाठी, त्यांच्याशी सहकार्य करण्यासाठी व अनुफूड इंडिया २०२३ मध्ये खाद्यपदार्थांचा अनोखा अनुभव देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कंपनीचा स्टॉल हॉल क्रमांक ४ येथे वसलेला असून स्टॉल क्रमांक डी०२ आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…