Home उद्योग कोल्हापूरमधील व्यवसायांत जस्टडायलच्या सहकार्याने लक्षणीय वाढ

कोल्हापूरमधील व्यवसायांत जस्टडायलच्या सहकार्याने लक्षणीय वाढ

37 second read
0
0
17

no images were found

कोल्हापूरमधील व्यवसायांत जस्टडायलच्या सहकार्याने लक्षणीय वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी):-समृद्ध वारसा, भव्य किल्ले आणि बहुढंगी संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरने प्राचीन परंपरा आणि आधुनिक बदल यांचा अनोखा मेळ घातला आहे. गेल्या काही काळात हा जिल्हा भारतातील सर्वोच्च दरडोई उत्पन्न मिळवणाऱ्या भागांपैकी एक ठरला आहे. साखर उत्पादनामुळे तेजीत असलेली अर्थव्यवस्था, कापड गिरण्या आणि उत्पादनामुळे कोल्हापूर महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र ठरले आहे. 

         कोल्हापुरातील व्यवसाय डिजिटल स्थित्यंतर करत असतानाच जस्टडायल मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेस (एमएसएमईज) उद्योगांना सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जस्टडायलतर्फे या व्यवसायांना ग्राहक मिळवण्यासाठी, नवीन कामे मिळवण्यासाठी व स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे विस्तार करण्यास मदत केली जाते. कोल्हापुरातील कित्येक व्यवसायांनी जस्टडायल प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपल्या व्यवसायाची व्यापकता वाढवली आहे तसेच नवे, मोठे ग्राहक मिळवण्यासाठी सहकार्य घेत लक्षणीय विकास केला आहे. 

        काव्याज कॉस्मेटिक अँड हेयर ट्रान्सप्लँट सेंटरने जवळच्या परिसरात त्यांची व्याप्ती यशस्वीपणे विस्तारत जस्टडायलच्या मदतीने आणखी मोठा ग्राहकवर्ग मिळवला आहे. ‘जस्टडायलवर नोंदणी करण्यापूर्वी माझे बहुतेक ग्राहक अगदी जवळच्या परिसरातले असायचे, मात्र जस्टडायलवर नोंदणी केल्यापासून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांतूनही मागणी मिळत आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘बुक माय अपॉइंटमेंट’ या सुविधेमुळे माझी व माझ्या पेशंट्सची चांगली सोय झाली आहे,’ असे काव्याज कॉस्मेटिक अँड हेयर ट्रान्सप्लँट सेंटरच्या मालक डॉ. वैदेही पोटे म्हणाल्या. 

जस्टडायलने कोल्हापुरातील बऱ्याच छोट्या व्यवसायांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्यासाठी ऑनलाइन अस्तित्व उभारून देत व उच्च क्षमता असलेल्या खरेदीदारांपर्यंत पोहोचवत मदत केली आहे. 

लता खटावकर, ऐश्वर्या कोल्हापुरी मसालेच्या संस्थापक यांनी छोट्या ग्राहकवर्गासह ऐश्वर्या कोल्हापुरी मसाले हा व्यवसाय सुरू केला होता. त्या म्हणाल्या, ‘जस्टडायलने आम्हाला नवे ग्राहक मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्यासाठी मदत केली. या प्रतिसादाने आमचा उत्साह वाढला असून आम्ही आता पॅन- इंडिया लिस्टिंगवर अपग्रेड केले आहे. आज आम्हाला देशभरातून ऑर्डर्स येतात, शिवाय आम्ही जपान, दुबई आणि स्पेनसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पोहोचलो आहोत. जस्टडायल आमच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.’

          व्यवसायांना दृश्यमानता मिळवून देत आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत जस्टडायलतर्फे उद्योजकांना विकास साधण्यासाठी मदत केली जाते. ‘मी गेल्या वर्षी व्यवसाय सुरू केला, पण पहिले सहा महिने संथ होते. जस्टडायलवर नोंदणी केल्यानंतर मागणीत वाढ झाली व पर्यायाने व्यवसायाचा लक्षणीय विकास झाला. डिजिटल विकास करण्याची इच्छा असलेल्या व्यवसाय मालकांना जस्टडायलची शिफारस करायला आवडेल,’ असे पेंट हाउस कोल्हापूरचे रोहित बोंगे म्हणाले. 

        ऑनलाइन अस्तित्व नसलेल्या व्यवसायांसाठी जस्टडायलने जबरदस्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत नवे ग्राहक मिळवण्यासाठी व शाश्वत विकास करण्यासाठी संधी दिली आहे. कोल्हापूर गॅरेज अँड वॉशिंग सेंटरचे मालक अमोल सुतार म्हणाले, ‘जस्टडायलवर नोंदणी करण्यापूर्वी माझ्या व्यवसायाला तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता. जस्टडायलवर नोंदणी केल्यापासून ग्राहकांकडून येणारी मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यातून व्यावसायिक संधीही वाढल्या आहेत.’

        त्रिमुर्ती स्टीलचे मालक युवराज पवार म्हणाले, ‘व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा आमचे काहीच डिजिटल अस्तित्व नव्हते. जस्टडायलवर नोंदणी केल्यानंतर व्यावसायिक विचारणांमध्ये खूप वाढ झाली. यामुळे आम्हाला ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे शक्य झाले.’

      कोल्हापूर वेगाने विकसित होत असून वेगवेगळ्या उद्योगांतील व्यवसाय स्पर्धेत आघाडीवर राहाण्यासाठी, नवे ग्राहक मिळवण्यासाठी आणि शाश्वत विकास करण्यासाठी डिजिटल धोरणांचा वापर करत आहेत. पारंपरिक व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करत उद्योजक त्यांच्या कामाचे स्वरुप बदलत आहेत आणि विस्तार व यशाच्या नव्या शक्यता खुल्या करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…