
no images were found
हुपरी येथे नेमिनाथ वाळवेकर स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धा 26 जानेवारीला
कोल्हापूर (प्रतिनिधी):- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने आणि कॅसल स्पोर्ट्स अकॅडमी, रेंदाळ.यांचे वतीने रविवार दि.२६ जानेवारी २०२५ रोजी वाळवेकर हॉल, वाळवेकर नगर ,हुपरी येथे कै.नेमिनाथ वाळवेकर (आबा)चषक एक दिवसीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धेचे हे सलग आठवे वर्ष आहे. स्पर्धा खुली असुन कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.स्पर्धेसाठी पहिले बक्षिस ५०००/- रू व चषक. दुसरे बक्षीस ३५००/- रु व चषक,तिसरे बक्षीस २५००/- व चषक अशाप्रकारे मुख्य २० बक्षिसे आहेत. तसेच विविध वयोगटात ७,९,११,१३,१५, वर्षाखालील, ज्येष्ठ खेळाडू , महिला खेळाडू, हुपरी परिसरातील खेळाडू यांचेकरिता देखील रोख पारितोषिके आणि चषक देणेत येणार आहेत.सर्व खेळाडू आणि पालक यांच्याकरिता दुपारी भोजन आणि चहाची सोय करणेत येणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. सूर्याजी भोसले मो. नं. ९७६६०७६५५५ यांचेशी संपर्क साधावा.