no images were found
कच्चे तेल कडाडले; तरी देशातील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
जागतिक बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून येत आहे तरीही देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज WTI क्रूड १.६६ डॉलर म्हणजेच, २.१३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७३.३९ डॉलरवर व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड १.८९ डॉलर म्हणजेच, २.२४ टक्क्यांनी वाढून ७९.९४ डॉलरवर पोहोचलं आहे. देशात सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोलचा दर ८४.१० रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ७९.७४ रुपये प्रति लिटर आहे. तर, राजस्थानमधील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल विकलं जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल ११३.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९८.२४ रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल ११२.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९७.३९ रुपये प्रति लिटर दराने विकलं जातं आहे.
22 मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखेच आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि इतर शहरांसाठी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवे दर जाणून घ्या.
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर, डिझेल९४.२७ रुपये प्रति लिटर
कोलकाता : पेट्रोल १०६.३ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
चेन्नई : १०२.६३ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर :पेट्रोल 04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे: पेट्रोल84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर :पेट्रोल 47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद :पेट्रोल 108 रुपये, डिझेल 96 रुपये प्रति लिटर
- परभणी :45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक :पेट्रोल 77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर