Home क्राईम वडिलांचा खून,आईवर हल्ला करून मुलाने घेतली निवांत झोप

वडिलांचा खून,आईवर हल्ला करून मुलाने घेतली निवांत झोप

12 second read
0
0
584

no images were found

वडिलांचा खून,आईवर हल्ला करून मुलाने घेतली निवांत झोप

आजरा : तालुक्यातील बहिरेवाडी येथील एका मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला करून माळ्यावर जाऊन झोपल्याचंही घटना घडलेली आहे. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिन कृष्णा गोरुले (वय ३२ वर्ष,)असे या निर्दयी मुलाचे नाव आहे.

           सचिन हा  आई-वडिलांसोबत शाळेजवळ राहतो. सचिन कागल येथे औद्योगिक वसाहतीत काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. मात्र काही कारणाने पत्नीसोबत घटस्फोट झाल्यामुळे त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याचे सतत आई-वडिलांसोबत भांडण होत असे. शुक्रवारी देखील सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घरात झालेल्या वादानंतर सचिनने आधी आपल्या आईवर हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. आपला जीव वाचविण्यासाठी ती घरातून बाहेर पळत आली. मात्र सचिनने घराचे दरवाजे बंद करून घेत वडील कृष्णा बाबू गोरुले (वय ६५ वर्ष) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कृष्णा गोरुले यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सचिन घराचा दरवाजा बंद करून माळ्यावर जाऊन निवांतपणे झोपला होता. मात्र जखमी आईने बाहेर जाऊन आरडाओरड करत सर्वांना एकत्र केले. सध्या बहिरेवाडी गावातील लक्ष्मी देवीच्या यात्रेचा कार्यक्रम सुरू आहे. काल देवीचा जागर असल्याने नागरिकांची मंदिराजवळ मोठी गर्दी होती. खुनाची बातमी कळता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
         स्थानिकांनी सुरुवातीला जखमी महिलेला खासगी वाहनाने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तसंच सचिन पळून जाऊ नये म्हणून घराचे पुढील व मागील दरवाजे नागरिकांनी बाहेरून बंद करून घेतले. याबाबत पोलिसांना माहिती कळवताच काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व सहकार्‍यांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व आरोपी मुलास ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…