no images were found
त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिव पिडींवरील बर्फाचा थर; पुजाऱ्यांचा प्रताप
नाशिक : गेल्या वर्षी जून महिन्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान हा बनाव असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. 30 जून 2022 रोजी पहाटे त्रंबकेश्वरच्या पिंडीवर बर्फ आढळल्याचे समोर आले होते. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा तयार झाला यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली. त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचे प्रकरण उघड झाले आहे. अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार केला म्हणून सुशांत तुंगार तसेच त्याला मदत करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर कलम ५०५ (३), ४१७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथे या बर्फ प्रकरणानंतर चर्चांना ऊत आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही चौकशी करून संबंधितांवर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती