Home स्पोर्ट्स महावितरणच्या  क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघ  उपविजेता

महावितरणच्या  क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघ  उपविजेता

9 second read
0
0
239

no images were found

महावितरणच्या  क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघ  उपविजेता

कोल्हापूर  : महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडळाच्या संघाने सर्वसाधारण उपविजेते पद प्राप्त केले. कोल्हापूरच्या व्हॉलिबॉल पुरुष संघास विजेतेपद, कबड्डी पुरुष संघास उपविजेते पद, टेबल टेनिस, बॅडमिंटन दुहेरी, खो- खो या खेळात पुरुष व महिला दोन्ही संघास उपविजेतेपद, कॅरम महिला संघास उपविजेतेपद प्राप्त झाले. व्यक्तिगत क्रीडाप्रकारात चार सुवर्ण व १५ रौप्यपदकावर कोल्हापूरच्या खेळाडूंनी नाव कोरले.

राज्यातील १६ परिमंडलांचे ८ संयुक्त संघांतील ७३० पुरुष व ३५३ महिला एकूण १०८३ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले.

कोल्हापूरच्या खेळाडूंनी ४ बाय १०० रिले प्रदीप वंजारे, शुभम निंबाळकर, नरेश सावंत, संभाजी जाधव,  भाला फेक सचिन चव्हाण, थाळी फेक ज्योती कांबळे, कुस्ती ७० किलो वजन गट उत्तम पाटील यांनी सुवर्णपदक पटकाविले. २०० मीटर धावणे भूमिका भोयर , ४०० मीटर धावणे प्रदीप वंजारे, ५००० मीटर धावणे  सचिन खटावकर, गोळा फेक हणमंत कदम, पूजा ऐनापुरे, भाला फेक अश्विनी जाधव,उंच उडी अश्विनी देसाई, बुद्धिबळ सौरभ माळी, टेबल टेनिस शकील शेख, बॅडमिंटन महिला दुहेरी विदुला पाटील व चैत्रा पै, कुस्ती (५७ किलो) गोरख रानगे, कुस्ती (६१ किलो) सुखदेव पुजारी, कुस्ती (७९ किलो) युवराज निकम, कुस्ती (९७ किलो)  प्रमोद ढेरे, कुस्ती (१२५ किलो) हणमंत कदम यांनी रौप्यपदक पटकाविले.

जळगावच्या एकलव्य क्रीडा संकुलावर  चारदिवशीय स्पर्धेचा समारोप झाला. 

महावितरणचे कोकण प्रादेशिकचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला. 

कोल्हापूर परिमंडळाच्या संघातील विजेत्या खेळाडूंचे मुख्य अभियंता परेश भागवत, सहाय्यक  महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, धर्मराज पेठकर, मनोज विश्वासे,  कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांनी अभिनंदन केले .

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…