
no images were found
सन मराठीवरील अदिती म्हणजेच सावी प्रीयेश केळकर एक प्रेरणादायी शक्ती…..
प्रेक्षकांची आवडती मालिका व उत्तम प्रतिसाद लाभत असलेल्या सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “आदिशक्ती” हटके विषय आणि वेगळ्या धाटणीमुळे चर्चेत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार तिच्या अभिनय कौशल्याने पात्रांना जिवंत करण्यात यशस्वी ठरले आहेत , प्रत्येक पात्र आपले काम चोख पार पाडताना दिसत आहे आणि त्याच सोबत मालिकेतील मध्यवर्ती भूमिका म्हणजेच छोटीशी शक्ती म्हणजेच ‘आदिती’ सुद्धा मागे नाही. हुशार, समंजस, धाडसी, गोंडस आदिती प्रेक्षकांना खिळवून ठेवते. दुष्ट आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडलेली छोटी ‘आदिती’ समोर उभी ठाकलेली दिव्य पार पाडत नेहमी सरस आणि उजवी ठरताना दिसते आणि हे करत असताना तीच्या सोबतीला असलेली ‘आई आदिशक्ती’ तिला मदत करते. आदिती नेहमी सकारात्मक ऊर्जेने भारलेली दिसून येते, तशीच ही भुमिका तितक्याच ताकदीने आणि ऊर्जेने पेलणारी कलाकार म्हणजेच सावी प्रियेश केळकर.
आई, बाबा, केळकर कुटुंबा प्रमाणेच आदिशक्ती मालिकेच्या सेटवर असलेले निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, चॅनेल टीम आणि सेटवरील संपुर्ण टीम देखील सावीसाठी एक कुटुंब बनले आहे. त्यामुळे सावी आदिती चे पात्र लीलया साकार करते. जितकी मेहनत आदिती हे पात्र निभावताना सावी करते तितकीच मेहनत घेऊन सेटवर मिळालेल्या वेळेत शालेय अभ्यास करताना सावी दिसते. आदिती म्हणजेच सावी केळकर या बाल कलाकाराच्या कष्टांना, अभ्यासाला आणि जिद्दीला सलाम.
पाहायला विसरू नका ‘आदिशक्ती’ , सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता, फक्त आपल्या सन मराठी वाहिनीवर