no images were found
सोन्या चांदीच्या दरात घसरण
नवी दिल्ली : दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत आहे. यूएस फेड आणि बहुतेक युरोपियन मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच यूएस डॉलरचे दर 10 महिन्यांच्या नीचांकीवरून सुधारले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. हा भाव 1,930 डॉलर प्रति औसवर होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सोन्याचे दर उच्चांकावर गेले. उच्चांकी झेप घेतल्यानंतरही सोने आता घसरले आहे. वायदे बाजारात सोन्यात घसरण झाली आहे. सोने सर्वकालीन 58,800 रुपयाच्या किंमतीवर पोहचले. त्यात आता 2,300 रुपयांची घसरण होऊन ग्राहकांचा फायदाच झाला आहे
चादीने ग्राहकांची चांदी केली होती. गेल्या काही दिवसांपासून चांदीत मोठी घसरण होत होती. 3 फेब्रुवारी रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 73800 रुपये होता. 4 फेब्रवारी रोजी त्यात 2600 रुपयांची घसरण होत 71200.00 झाला असल्याचे गोल्ड रिर्टन वेबसाईटने दिले आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चांदीचा दर 74700 रुपये झाला होता.