
no images were found
संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याची भेट
मुंबई : स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खा. संभाजीराजे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रेतील विविध विषयांबाबतचे निवेदन दिले. याच बरोबर विविध विषयांवर चर्चाही केली.
छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी चित्रपट निर्माण करताना त्यातील ऐतिहासिक तथ्ये, परंपरांचे योग्य सादरीकरण आदी महत्त्वपूर्ण बाबी तपासण्यासाठी तज्ज्ञ इतिहास संशोधक, अभ्यासक यांची शासकीय समिती स्थापन करावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. तसेच दुर्गराज रायगडच्या जतन-संवर्धनाबाबत रायगड विकास प्राधिकरणाशी संबंधित कामांची सविस्तर चर्चा केली.कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासात्मक कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने दिली.
कोल्हापुरातील ऐतिहासिक स्थळांच्या जतन, संवर्धन व विकासासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीची मागणी केली. तसेच पेण तालुक्यातील बाळगंगा धरणग्रस्तांच्या समस्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडून सविस्तर निवेदन दिले.