
no images were found
20 एप्रिलला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण
नव्या वर्षाची सुरुवात होऊन आता नवा महिनाही सुरु झाला आहे. याच महिन्यात वर्षातील पहिलं सूर्यग्रहणही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. 2023 या वर्षातील पहिलं ग्रहण एप्रिल महिन्यामध्ये असणाऱ आहे. यामध्ये सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत थेट पोहोचू शकत नाहीत कारण पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यास सूर्यग्रहण होते.. यंदाच्या वर्षी 20 एप्रिल 2023 ला हे ग्रहण असणार आहे. सकाळी 7 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत हा ग्रहणकाळ असेल. यादरम्यान पूजाअर्चा करण्यावर विशेष भर असणार आहे. सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिलला लागेल. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. ज्यामुळं त्याचा सूतक काळही मान्य नसे. हे ग्रहण कंकणाकृती असणार आहे. वर्षातलं हे पहिलं सूर्यग्रहण माइक्रोनेशिया, दक्षिण पॅसिफिक सागर, तिमोर, न्यूजीलंड, मलेशिया, फिजी, सिंगापुर, थाईलंड, अंटार्क्टिका, जपान, समोआ, सोलोमन, बरूनी, कंबोडिया, चीन, अमेरिका, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपींस, ऑस्ट्रेलिया, विएतनाम, तैवान, दक्षिण हिंद महासागर भागात दिसेल.