
no images were found
कोयता गॅंगची पुनरावृत्ती औरंगाबादमध्येही
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि परिसरात कोयता गॅंगची मोठ्याप्रमाणावर दहशत पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यातील कोयता पॅटर्न औरंगाबादमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. कारण वाळूज परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून चक्क एका 26 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. इमरान इसाक शेख आणि इरफान इसाक शेख असे दोन्ही आरोपींचे नावं आहे. तर शुभम भानुदास जाधव असे हल्ला करण्यात आलेल्या जखमी तरुणाचे नाव आहे. इरफान व इम्रान हे नेहमी वेगवेगळ्या कारणांनी शुभमसोबत वाद करत असतात. मात्र एकाच गावातील असल्याने शुभमने नेहमी त्यांच्याकडे दुलर्क्ष केले. 2 जानेवारी सकाळी शुभम हा सावखेडा येथील शिवाजी चौकात चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसला असता तिथे इरफान आणि इम्रान दोघेजण आले. तसेच इरफानने एकाला फोन लावून, माझ्या व्याजाचे पैसे न देता तू पळून जाणार असल्याचं मला शुभमने सांगितले असल्याचं सांगितले. त्यामुळे बाजूला असलेल्या शुभमने याबाबत त्याला जाब विचारला व वादाला सुरुवात झाली. मी कोणाबाबत काहीही बोललो नसताना माझ्या नावाची इतरांना खोटी माहिती देऊन आमच्यात वाद कशाला लावत असल्याचा जाब शुभमने इरफानला विचारला. आपण कोणाबद्दल काहीही बोललो नसल्याचा खुलासा करायला लागला. त्यामुळे संतापलेल्या इरफाने शुभमची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. तेवढ्यात इम्रान देखील पळत आला आणि त्याने शुभमच्या तोंडावर मारहाण केली. त्यानंतर नागरिकांनी दोघांचे वाद मिटवत त्यांना वेगळे केले.
हातातील लोखंडी कोयता घेऊन आलेल्या इरफानने शुभमवर हल्ला करत त्यांच्या डोक्यात कोयत्याने मारहाण केली. दरम्यान यावेळी शुभम जीव वाचवून पळत असताना, पुन्हा त्याचा पाठलाग सुरु केला. मात्र कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला आणि वाळूज पोलिसात पोहचला. पोलिसांनी आधी त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तसेच त्यानंतर इम्रान आणि इरफान दोन्ही भावांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.