no images were found
सुकन्या समृध्दी योजनेसाठी 9 व 10 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम
कोल्हापूर : ‘सुकन्या समृध्दी योजना’ खाते उघडण्यासाठी दि. 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष मोहिम ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील 10 वर्षाखालील मुलींच्या पालकांनी दि. 9 व 10 रोजी जवळ्च्या पोस्ट ऑफ़ीसमध्ये जाऊन अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे.
‘सुकन्या समृध्दी योजना’ ही लोकाभिमुख असून, महिला सक्षमीकरण व आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून प्रत्येक व्यक्तिपर्यंत त्याची माहिती पोहचवण्याच्या हेतुने डाक विभाग कोल्हापूर मार्फत दि. 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात खाते उघडण्याच्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून 24 तासात राष्ट्रीय पातळीवर 7.5 लाख खाती उघडण्याचे लक्ष्य आहे, असेही श्री. इंगळे यांनी कळविले आहे.